पॉर्न स्टार मिया खलिफा ही सतत चर्चेत असते. कधी तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या सोशल मीडियावर मिया खलिफाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे इस्रायली महिलेशी भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. तिच्या या भांडणाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर सध्या मिया खलिफाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मिया कॅबसाठी वाट पाहात असल्याचे दिसत आहे. त्यावेळी तेथे एक इस्रायली महिला तिच्या मुलासोबत उभी असल्याचे दिसत आहे. त्या महिलेसोबत सुरु असलेल्या भांडणाचा व्हिडीओ स्वत: मियाने रेकॉर्ड केला आहे. ती महिला 'एम यिसरेल चाय' असे बोलत आहे. याचा अर्थ 'इथे इस्रायल लोक राहतात' असा होता.
वाचा: वडिलांचा नकार, पहिल्या पत्नीसोबत सतत भांडणे; वाचा जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांची लव्हस्टोरी
मिया व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात करते तेव्हा ती महिला 'एम यिसरेल चाय' पुन्हा बोलते. ती मियाच्या जवळ येऊन पुन्हा पुन्हा हेच बोलते. यावर मिया 'माझ्यापासून लांब रहा. तुझ्या तोंडातून दुर्गंधी येत आहे. हे भगवान! तुझ्या तोंडून नॉक ऑफ फलाफल जशी दुर्गंधी येत आहे' असे म्हणते.
हा व्हिडीओ शेअर करत मियाने 'झिओनिस्ट त्यांची जागा सोडत आहेत. तिने मला सतत स्लर्स म्हणत लॉबीमधून माझा पाठलाग करत होती. अँटिक ज्वेलरी फेअरपर्यंत ती माझ्या मागे आली. ती कदाचित एक वेंडर आहे हे तिच्या वागण्यावरुन स्पष्ट होत आहे. तसेच तिचा व्यवसाय आणि राहणीमान कसे आहे हे तिच्या वागणुकीतून दिसत आहे' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
इस्रायली महिलेने मियावर संताप व्यक्त करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या वेळी मियाने हमासला पाठिंबा देत पोस्ट केली होती. त्यानंतर तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता. आता या इस्रायली महिलीने मियाचा पाठलाग केला असून तिला खूप सुनावले आहे.