Mi Honar Superstar Jodi No. 1 : गेल्या काही दिवसांपासून ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमाची चर्चा रंगली होती. आता ७ जुलै रोजी या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील आकाश आणि सुरज मोरे या जोडीने बाजी मारली आहे. पण या विजेत्या जोडीला बक्षिस काय मिळाले असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली होती. मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात आला. पलख-पूर्वा, आकाश-सुरज, सिद्धेश-रुचिता आणि अपेक्षा-प्रतिक्षा हे स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात पोहोचले होते. पण या अटीतटीच्या सामन्यात पुण्यातील कोथरुड येथील आकाश आणि सुरज मोरे यांनी विजेतेपदावर स्वत:चे नाव कोरले.
वाचा: अनंत अंबानीच्या संगीत सोहळ्यात सलमान खानचा स्वॅग, पाहा व्हिडीओ
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमात दोन जोड्या उपविजेत्या ठरल्या आहेत. सिद्धेश थोरात-रुचिता जामदार आणि अपेक्षा लोंढे-प्रतिक्षा लोंढे या दोन जोड्यांना उपविजेते पदाचा मान विभागून देण्यात आला. तृतीय क्रमांक पूर्वा साळेकर आणि पलक मोरे या जोडीने पटकावला. एकंदरीत हा सोहळा अतिशय रंगतदार ठरला होता.
वाचा: कालीन भैय्या सर्वात महाग! 'मिर्झापूर'साठी कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले?
‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’ कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात विजेती जोडी आकाश आणि सुरज मोरे यांना पाच लाखांची रोख रक्कम देण्यात आलीय त्यानंतर सन्मानचिन्ह देखील देण्यात आले होते. तसेच उपविजेत्या दोन जोड्यांना दोन लाख रुपये रोख रक्कम देण्यात आली. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला एक लाख रुपये देण्यात आले.
वाचा: अशोक सराफ आणि माधव अभ्यंकरची होणार टक्कर, 'लाईफलाईन' सिनेमातील अण्णांचा लूक व्हायरल
आकाश आणि सुरज दोघेही सख्खे भाऊ आहेत. लहानपणापासूनच दोघांनाही नृत्याची आवड आहे. पण घरची परिस्थिती हालाखीची आहे. अशा परिस्थितील आपल्या मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईने धावपळ केली. तिने दोघांना नृत्याचे प्रशिक्षण दिले. अनेक छोट्या मोठ्या स्पर्धांमधून भाग घेत घेत आकाश-सुरजला मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन कार्यक्रमाविषयी कळलं आणि त्यांनी ऑडिशनसाठी थेट मुंबई गाठली.
संबंधित बातम्या