बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय सेतुपती यांचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यापोठापाठ चित्रपटातील एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या गाण्याला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. कारण या गाण्यात विजय आणि करिनाचा लिपलॉक सीन आहे.
मेरी ख्रिसमस' या चित्रपटातील 'नजर तेरी तुफान' हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे पॅपोनने गायले आहे. या गाण्याला प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केले आहे. 'नजर तेरी तूफान' या गाण्याचा गीतकार वरुण ग्रोवर आहे. गाण्यामधील कतरिना आणि विजय यांच्या 'लिपलॉक' सीनने अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच कतरिना आणि विजयचा रोमँटिक अंदाज या गाण्यात दिसत आहे.
वाचा: जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान
'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघव करत आहे. त्याने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये चित्रपटात विजय सेतुपतीच्या निवड करण्यामागचा किस्सा सांगितला आहे. ते एका फिल्म फेस्टिव्हलसाठी मेलबर्नला गेले होते. त्यावेळी तिथे '९६' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी विजयची भेट घेतली आणि त्याला हिंदीत बोलता येते का असे विचारले. यावर विजयने होय असे उत्तर दिले आणि दिग्दर्शकाने त्याला 'मेरी ख्रिसमस'साठी लगेच निवडले.
संबंधित बातम्या