Merry Christmas Day 5: कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ बजेटही वसूल करेना! पाचव्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई-merry christmas box office collection day 5 katrina kaif and vijay sethupathi s film collect 1 cr on 5th day ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Merry Christmas Day 5: कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ बजेटही वसूल करेना! पाचव्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई

Merry Christmas Day 5: कतरिनाचा ‘मेरी ख्रिसमस’ बजेटही वसूल करेना! पाचव्या दिवशीही अवघी ‘इतकी’ कमाई

Jan 17, 2024 08:49 AM IST

Merry Christmas Box Office Collection Day 5: 'मेरी ख्रिसमस' काही कोटींची कमाई करण्यासाठीही धडपडत आहे. पाचव्या दिवशी देखील या चित्रपटाच्या कमाईचे आकडे निशाजनक आहेत.

Merry Christmas Box Office Collection Day 5
Merry Christmas Box Office Collection Day 5

Merry Christmas Box Office Collection Day 5: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विजय सेतुपती यांचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट 'मेरी ख्रिसमस' १२ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, अवघ्या ५ दिवसांतच या चित्रपटाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर महेश बाबूच्या ‘गुंटूर करम’, तेजा सज्जाचा ‘हनुमान’ आणि धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’सह अनेक चित्रपटांशी स्पर्धा करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कमाईच्या बाबतीत 'मेरी ख्रिसमस' खूपच मागे पडला आहे. रिलीजच्या ५ दिवसांत हा चित्रपट १५ कोटींचीही कमाई करू शकलेला नाही. 'मेरी ख्रिसमस'ने पहिल्या मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या ५व्या दिवशी किती कमाई केली, ते जाणून घेऊया...

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' हा एक थ्रिलर चित्रपट आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत एकाच वेळी प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासाठी धडपडत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या गर्दीत या चित्रपटाला मात्र फारसे प्रेक्षक मिळत नाहीयेत. 'मेरी ख्रिसमस' काही कोटींची कमाई करण्यासाठीही धडपडत आहे. पाचव्या दिवशी देखील या चित्रपटाच्या कमाईचे आकडे निशाजनक आहेत.

Pushpa 2 OTT Release: थिएटरआधीच ‘पुष्पा २’चं ओटीटी रिलीज जाहीर! पाहा कुठे आणि कधी बघता येणार अल्लू अर्जुनचा चित्रपट

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी २.४५ कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाचे कलेक्शन ३.४५ कोटी रुपये होते. तर, तिसऱ्या दिवशी 'मेरी ख्रिसमस'ने ३.८३ कोटी रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी चित्रपटाने अवघ्या १.६५ कोटींचा व्यवसाय केला होता. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पाचव्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या अर्लीट्रेंड रिपोर्टनुसार, 'मेरी ख्रिसमस' ने रिलीजच्या पाचव्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे आकडे अंदाजे असून, यात काही चढ-उतार होऊ शकतात. मात्र, या आकडेवारीसह पाच दिवसांत 'मेरी ख्रिसमस'चे एकूण कलेक्शन आता १२.५३ कोटींवर पोहोचले आहे.

‘मेरी ख्रिसमस' हा चित्रपट रिलीज आधी प्रचंड चर्चेत होता. पण, चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'गुंटूर करम', 'हनुमान', 'कॅप्टन मिलर' यांच्यासोबतच्या शर्यतीत मागे पडला आहे. ६० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाला अद्याप निम्मा खर्च वसूल करणेही कठीण झाले आहे.

Whats_app_banner