मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Merry Christmas BO Collection: ‘मेरी ख्रिसमस’ बॉक्स ऑफिसवर गडगडला! चौथ्या दिवसाची कमाई पाहिलीत?

Merry Christmas BO Collection: ‘मेरी ख्रिसमस’ बॉक्स ऑफिसवर गडगडला! चौथ्या दिवसाची कमाई पाहिलीत?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 16, 2024 11:17 AM IST

Merry Christmas Box Office Collection Day 4: ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटातील कतरिना कैफच्या कामाची खूप चर्चा होत आहे. दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र अतिशय संथ गतीने पुढे जाताना दिसत आहे.

Merry Christmas Box Office Collection Day 4
Merry Christmas Box Office Collection Day 4

Merry Christmas Box Office Collection Day 4: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि साऊथ स्टार अभिनेता विजय सेतुपती यांचा ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला क्राईम थ्रिलर चित्रपट म्हणून पसंत केले जात आहे. या चित्रपटातील कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्या अप्रतिम अभिनयाचेही खूप कौतुक होत आहे. ‘मेरी ख्रिसमस’ हा कतरिना कैफच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र, या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने फारशी जादू दाखवलेली नाही. आता या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटातील कतरिना कैफच्या कामाची खूप चर्चा होत आहे. दरम्यान, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र अतिशय संथ गतीने पुढे जाताना दिसत आहे. ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर फारसे यश मिळताना दिसत नाहीये. श्रीराम राघवन यांच्यासारखे दिग्दर्शक, कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्यासारखे दमदार कलाकार असताना देखील या चित्रपटाला फारशी जादू दाखवता आलेली नाही. चौथ्या दिवशी या चित्रपटाने खूपच कमी गल्ला जमवला आहे.

Filmfare Awards 2024: ‘फिल्म फेअर २०२४’मध्येही दिसला शाहरुख खानचा जलवा; पाहा नामांकन यादी

सॅकनिल्कच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, कतरिना कैफ-विजय सेतुपती अभिनित ‘मेरी ख्रिसमस’ने चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी अवघ्या १.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन १३ कोटींवर पोहोचले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘हनुमान’ आणि ‘गुंटूर करम’ यांसारख्या चित्रपटांनी ‘मेरी ख्रिसमस’ला तगडी टक्कर दिली आहे. या तिन्ही चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटाची गती थोडी मंदावली आहे. या चित्रपटाला कमी प्रतिसाद मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटाच्या कथानकाची संथ गती असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट खूप संथ आहे, असे अनेकांनी म्हटले आहे.

‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात अभिनेता विजय सेतुपती आणि अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत झळकले आहेत. यासोबतच संजय कपूर, टिनू आनंद, विनय पाठक, अश्विनी काळसेकर आणि प्रतिमा काझमी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचं कथानक आणि त्यातील बारकावे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारे आहेत.

WhatsApp channel