मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पक्ष अडचणीत असताना सचिव साड्या दाखवतोय; आदेश बांदेकरांवर भन्नाट मीम्स व्हायरल
आदेश बांदेकर
आदेश बांदेकर
25 June 2022, 13:16 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
25 June 2022, 13:16 IST
  • या सगळ्यात लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावर सोशल मीडियावर भन्नाट मीम वायरल झाले आहेत. पक्ष संकटात असताना ते काहीच करत नसल्याचं या मीम मध्ये चित्रित करण्यात आलं आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करत त्यांना परत येण्यास सांगितले होते. मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. एकीकडे निलंबनाची कारवाई करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. आता पर्यंत सेनेचे ४० आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आता पुढे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र या सगळ्यात लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावर सोशल मीडियावर भन्नाट मीम वायरल झाले आहेत. पक्ष संकटात असताना ते काहीच करत नसल्याचं या मीम मध्ये चित्रित करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आदेश हे झी मराठीवरील 'महामिनिस्टर' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. मात्र ते शिवसेनेचे सदस्य आणि पक्षाचे सचिव देखील आहेत. मात्र राजकीय उलथापालथ झाल्यापासून आदेश कुठेही दिसलेले नाहीत किंवा त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावरून सोशल मीडियावर अनेक मीम व्हायरल झाले आहेत. एका मीममध्ये आदेश हे ११ लाखांची पैठणी दाखवताना दिसत आहेत. यात ते प्रेक्षकांना प्रश्न विचारताना दिसतायत की ही पैठणी कोण जिंकणार, त्यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिलं, 'इथं पक्ष अडचणीत आणि सचिव साड्या दाखवतोय'. हा मीम सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यासोबतच आणखी एका मीमची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.

या मीम मध्ये काही व्यक्ती आपापसात भांडताना दिसत आहेत. या व्यक्तींना आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे यांची नावं देण्यात आली आहे. तर एक व्यक्ती बाजूला आरामात बसून खाताना दाखवण्यात आली आहे. या व्यक्तीला आदेश यांचं नाव देण्यात आलं आहे. याचा अर्थ बाकी कुठे काहीही घडलं तरी आदेश यांना त्याचा फरक पडत नाहीये असा आहे. हे मीम पाहून नेटकरी पोट धरून हसत आहेत. सोबतच खरंच आहे हे अशा प्रतिक्रिया देखील देत आहेत. हे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग