गेल्या काही दिवसांपासून 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या फेस्टिव्हलला हजेरी लावली. पण या सगळ्यात मराठमोळी अभिनेत्री छाया कदमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पायल कपाडियाच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटातील भूमिकेसाठी छाया कदमचे खूप कौतुक होत आहे. प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेव्हा तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळाली तेव्हा अभिनेत्री भावूक झाली होती. छायाने यापूर्वी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, ज्यातून एक कलाकार म्हणून तिची अष्टपैलू प्रतिमा निर्माण झाली आहे. आता कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये छायाचे कोणते चित्रपट दाखवण्यात आले चला पाहूया…
छायाचा जन्म मुंबईतील कलिना येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातून तिने शिक्षण घेतले. तिने शिक्षण घेत असताना राज्यस्तरावर कबड्डी खेळली आणि टेक्सटाईल डिझाइनमध्ये पदवी मिळवली. छायाला लहान वयातच अभिनयाची आवड होती. त्यामुळे तिने हायस्कूल आणि कॉलेजमध्ये स्टेजवर परफॉर्म करण्यास सुरुवात केली. वामन केंद्रे यांच्या झुलवा या नाटकातून छायाने करिअरला सुरुवात केली. तिचे हे पहिले नाटक चांगले गाजले होते. त्यानंतर २०१०मधील बायमनस हा तिचा पहिला चित्रपट होता. पण तो कधीच प्रदर्शित झाला नाही.
वाचा: उफ्फ ये अदाये! अमृता खानविलकरने मुंबई पोलिसांसाठी असे का म्हटले? नेमकं काय आहे प्रकरण
छायाने नागराज मंजुळे यांच्या सैराट (२०१६) या चित्रपटात सुमन अक्काची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मराठी आणि महाराष्ट्राचा फेव्हरेट कोणमध्ये तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक महिला अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते.
वाचा: ‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’मध्ये गौरव मोरेचा अनोखा प्रयोग, सादर करणार हॉरर अॅक्ट
छायाचा न्यूड हा चित्रपट चांगला चर्चेत होता. या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक महिला अभिनेत्रीच्या श्रेणीत महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. तसेच तिच्या रवी जाधव यांच्या सामाजिक-नाटकातील अभिनयाचे कौतुक झाले.
वाचा: मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर
धोलीदा गाण्यातील छाया आठवते? गंगूला आश्चर्यचकित करणारी बेफिकीर पणे नाचणारी एक महिला? संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. एस. हुसेन झैदी लिखित 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आलिया भट्ट स्टारर चित्रपटात तिने रश्मीबाईची भूमिका साकारली होती.
छाया किरण रावच्या 'लपटा लेडीज' या चित्रपटात मंजू माईच्या भूमिकेतून प्रसिद्धीस आली. मुख्य पात्र नसले तरी कथा पूर्ण करण्यास छायाच्या मंजू माईचा मोठा वाटा आहे.
कुणाल खेमू दिग्दर्शित मडगाव एक्स्प्रेसमध्ये छायाने पुन्हा एकदा बाजी मारली. डार्क कॉमेडी असलेल्या या चित्रपटात ती कांचन कोंबडी नावाच्या धोकादायक गुन्हेगाराची भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका देखील सर्वांना आजही लक्षात आहे.
संबंधित बातम्या