बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर त्याची पत्नी मीरा राजपूत आणि दीर ईशान खट्टर यांच्यामध्ये घट्ट नाते असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळी तिघे एकत्र फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसते. सध्या मीरा आणि ईशानच्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पती आणि दीरासोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते अभिनेता आमिर खानचा चित्रपट 'दिल चाहता है'मधील आयकॉनिक सीन रिक्रिएट करताना दिसत आहेत. चित्रपटातील या सीनमध्ये सैफ अली खानला आमिर खान एक पुरुष होण्याचा सल्ला देतो. तसेच गर्लफ्रेंड समोर खंभीरपणे उभे राहण्यास सांगतो. हा सीन मीरा, शाहिद आणि ईशानने रिक्रिएट केला आहे.
दरम्यान, मीरा मजेशीर अंदाजात ईशानच्या कानशिलात लगावली आहे. ते पाहून शाहिद चकीत होतो. त्यानंतर तिघांनाही हसू अनावर होते. हा व्हिडीओ शाहिदने शेअर करत, 'दिल क्या चाहता है?' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
अभिनेत्री क्रिती सेनॉनने या व्हिडीओवर कमेंट करत, 'क्रॅक' असे म्हटले आहे. तर काहींनी मीराच्या अभिनय कौशल्याची तारीफ केली आहे. दोन्ही भाऊ अभिनेते असूनही मीराचा अभिनय पाहण्यासारखा आहे अशी कमेंट एका यूजरने केली आहे.
संबंधित बातम्या