बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून अभिनेत्री मीना कुमारी ओळखली जाते. आरस्पानी सौंदर्यामुळे बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या मीना कुमारीने वयाच्या ३८व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. आज १ ऑगस्ट रोजी मीना कुमारीची जयंती आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया मीना कुमारीच्या आयुष्यातील काही खास गोष्टी..
मीना कुमारीचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईत झाला. तिने वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. मीना कुमारीचे ‘पाकिजा’, ‘परिणीता’ , ‘शारदा’, ‘आज़ाद, ‘दायरा’, ‘दो बीघा ज़मीन’ आणि इतर काही चित्रपट तुफान हिट ठरले होते. चित्रपट करत असतानाच तिची ओळख दिग्दर्शक कमाल अमरोशी झाली. त्यांना आगामी चित्रपटात मीना कुमालीला कास्ट करायचे होते. मात्र कमालचा स्वभाव आवडत नसल्यामुळे तिने नकार दिला. कसेबसे वडिलांनी मनवल्यावर मीना कुमारी तयार झाली होती.
वाचा: शम्मी कपूरच्या अटीमुळे एका श्वासात रफींनी गायले होते गाणे
दरम्यान, एकत्र काम करत असतानाच मीना कुमारी आणि कमाल यांचे सूत जुळले. मात्र कमाल पूर्वीपासूनच विवाहित असल्यामुळे मीना कुमारी आणि कमाल यांच्या नात्याचा मीना कुमारी यांच्या वडिलांनी विरोध केला होता. कमाल यांच्या मित्राने मीनाकुमारी यांची समजूत काढल्यानंतर कमाल आणि मीनाकुमारी यांनी पळून जाऊन लग्न केले.
मीना कुमारी या रोज ८ ते १० या वेळात क्लासला जायच्या. त्यामुळे त्यांनी दोन तासात जाऊन लग्न आटोपले होते. घाईघाईमध्ये १४ फेब्रुवारी १९५२ रोजी केवळ दोन तासात मीना कुमारी आणि कमल यांनी लग्नगाठ बांधली. मात्र त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. १९६४साली त्यांनी घटस्फोट घेतला. ३१ मार्च १९७२ रोजी लिव्हर सोरायसिसने मीना कुमारीचे निधन झाले.