मराठी बातम्या  /  Entertainment  /  Mc Stan Is Getting Married With Gf Bubba

MC Stan : 'बिग बॉस १६'चा विजेता एमसी स्टॅन अडकणार लग्नबंधनात, गर्लफ्रेंडलचा फोटो पाहिलात का?

एमसी स्टॅन
एमसी स्टॅन (HT)
Aarti Vilas Borade • HT Marathi
Feb 28, 2023 03:01 PM IST

MC Stan Marriage: जाणून घ्या रॅपर एमसी स्टॅनच्या गर्लफ्रेंडबद्दल काही गोष्टी…

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बिग बॉसचे १६वे पर्व पार पडले. या पर्वातील मराठमोळ्या शिव ठाकरेने सर्वांची मने जिंकली होती. मात्र एमसी स्टॅनने बिग बॉस १६चा ताज स्वत:च्या नावे केला. आता एमसी स्टॅन लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमसी स्टॅनने एका मुलाखतीमध्ये प्रेमाची कबूली दिली. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव बुबा आहे. त्याने शोमध्ये देखील अनेकदा बुबाचे नाव घेतले आहे. स्टॅनची आई फॅमिली वीकमध्ये 'बिग बॉस'च्या घरात त्याला भेटायला आली तेव्हा म्हणालेली की, "स्टॅन लवकरच बुबासोबत लग्न करणार आहे." आता एमसी स्टॅनने स्वत: लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे.

कोण आहे एमसी स्टॅनची गर्लफ्रेंड बुबा?

बुबाचे खरे नाव अनम शेख आहे. ती केवळ २४ वर्षांची आहे. बिग बॉसच्या घरात स्टॅनने त्याची फिल्मी लव्हस्टोरी सांगितली होती. "माझे बुबावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचे आहे. त्यामुळे मी ३० ते ४० लोकांना घेऊन बुबाच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो होतो. तिच्या घरच्यांना सांगितले, आमच्या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर तिला पळून घेऊन जाईन" असे स्टॅनने अर्चना आणि सौंदर्याला सांगितले.

WhatsApp channel

विभाग