MC Stan: कॉन्सर्टदरम्यान एमसी स्टॅनचा राग अनावर, व्यक्तीला मारहाण केल्याचा Video viral
Mc Stan Viral Video: सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीच्या अंगावर धावून गेल्याचे दिसत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बिग बॉसचे १६ वे सिझन पार पडले. या पर्वाचा विजेता ठरला रॅपर एमसी स्टॅन. सध्या सोशल मीडियावर एमसी स्टॅनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो कॉन्सर्टदरम्यान चक्क एका व्यक्तीला मारताना दिसत आहे.
ट्रेंडिंग न्यूज
१८ मार्च रोजी एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात करण्यात आला होता. हा कॉन्सर्ट नागपूरमध्ये होता. या कॉन्सर्टमध्ये एक व्यक्ती एमसी स्टॅनच्या चैनला हात लावते. त्यानंतर तो त्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो.
वाचा: प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन! दिसणार 'या' मालिकेत
सध्या सोशल मीडियावर याच कॉन्सर्टचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅन एका व्यक्तीला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जात आहे. आजूबाजूला असलेले सुरक्षा रक्षक त्याला वेळीच थांबवतात. या व्हिडीओमध्ये एमसी स्टॅनचा राग दिसत आहे.
यापूर्वी १७ मार्च रोजी एमसी स्टॅनचा इंदूर येथे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. मात्र कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही तास आधीच रद्द करण्यात आला. कारण करणी सेनेच्या सदस्यांनी कॉन्सर्टच्या ठिकाणी जाऊन जोरदार हंगामा केला होता आणि स्टॅनला धमकीही दिली होती. स्टॅनच्या रॅपमध्ये आक्षेपार्ह शब्दांचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
विभाग