मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  MC Stan: एमसी स्टॅनचा जलवा! नेहा कक्कर आणि अरिजित सिंहला मागे टाकत केला नवा विक्रम

MC Stan: एमसी स्टॅनचा जलवा! नेहा कक्कर आणि अरिजित सिंहला मागे टाकत केला नवा विक्रम

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 02, 2023 12:51 PM IST

यापूर्वी एमसी स्टॅनने क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेता शाहरुख खानला मागे टाकले होते. आता त्याने आणखी एक नवा विक्रम केला आहे.

एमसी स्टॅन
एमसी स्टॅन (HT)

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. नुकताच बिग बॉसचे १६वे पर्व पार पडले. या पर्वातील मराठमोळ्या शिव ठाकरेने सर्वांची मने जिंकली होती. मात्र एमसी स्टॅनने बिग बॉस १६चा ताज स्वत:च्या नावे केला. आता स्टॅनने एक नवा विक्रम केल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमसी स्टॅनने एआर रहमान, नेहा कक्कर, अरिजित सिंह सारख्या दिग्गज गायकांना मागे टाकत आता नवा रेकॉर्ड केला आहे. तो लोकप्रिय भारतीय म्यूजिशियन ठरला आहे. त्याने या यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. गूगल ट्रेंड्सच्या रिपोर्ट्सनुसार एमसी स्टॅन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
वाचा: शाहरुख खान आणि विराट कोहलीला मागे टाकत एमसी स्टॅनने रचला नवा इतिहास

SS
SS (HT)

यापूर्वी एमसी स्टॅनने बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकत नवा विक्रम केला होता. बिग बॉस १६ जिंकल्यानंतर एमसी स्टॅन जवळपास १० मिनिटांसाठी इन्स्टाग्रामवर लाइव आला. त्यावेळी त्या लाइव्हमध्ये ५४१ हजार लोक होते. आजपर्यंत कोणत्याच भारतीय सेलिब्रिटीच्या लाइव्हला इतके व्ह्यूज मिळालेले नाहीत. यापूर्वी शाहरुख खानने विक्रम केला होता. जेव्हा शाहरुख इन्स्टावर लाइव्ह आला होता तेव्हा २५५ हजार व्ह्यूज मिळाले होते.

एमसी स्टॅन इन्स्टाग्रामवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवणाऱ्या जगातील टॉप १० यादीमध्ये आला होता. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर बीटीएस आर्मी आहे. फेब्रुवारी महिन्यात बीटीएस आर्मीचे बीटीएस वी आणि जियोन जुंगकुक इन्स्टाग्रामवर लाइव्ह आले होते. तेव्हा ९२२ हजार व्ह्यूज त्यांना मिळाले होते.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग