मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mazhi Tuzhi Reshimgath: नेहा-यशची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Mazhi Tuzhi Reshimgath: नेहा-यशची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार? ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 10:03 AM IST

Mazhi Tuzhi Reshimgath: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील मुख्य अभिनेता श्रेयस तळपदे याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

mazhi tuzhi reshimgath
mazhi tuzhi reshimgath

Mazhi Tuzhi Reshimgath: छोट्या पडद्यावरच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या कलाकारांनी या निमित्ताने अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. लोकप्रिय मालिका ऑफ एअर गेल्याने प्रेक्षकही दुःखी झाले होते. मात्र, श्रेयस तळपदे याने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालिका ऑफ एअर जाताना श्रेयस तळपदेने एक गुडबाय पोस्ट शेअर केली आहे. मात्र, या पोस्टच्या कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील मुख्य अभिनेता श्रेयस तळपदे याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस मालिकेचा शेवटचा सीन शूट करताना दिसत आहे. कट म्हटल्यावर तो कॅमेरासमोर नमस्कार करताना दिसला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने खास कॅप्शन देखील लिहिले आहे. ‘शो संपतोय….आपलं नातं नाही…. आपली ही रेशीमगाठ अशीच कायम राहणार आहे…वर्षानुवर्ष… कारण आम्ही लवकरच काहीतरी नवीन घेऊन येऊ….फक्त तुमच्यासाठी…. आणि म्हणूनच कोणीतरी म्हंटलय…. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त….कुछ समझे??’

श्रेयस तळपदेच्या या पोस्टमुळे आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा सिक्वेल येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. श्रेयसच्या या पोस्टने चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपली लाडकी जोडी नेहा आणि यश पुन्हा एकत्र दिसणार असल्याने आता सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा सिक्वेल येणार की, नेहा आणि यश म्हणजे श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत झळकणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोघे पुन्हा एकत्र दिसणार यानेच चाहते आनंदित झाले आहेत.

IPL_Entry_Point