मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  LagnaKallol Trailer: गडबडीमुळे घोटाळा झालाय! 'लग्न कल्लोळ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

LagnaKallol Trailer: गडबडीमुळे घोटाळा झालाय! 'लग्न कल्लोळ'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 21, 2024 07:58 AM IST

Mayuri Deshmukh Upcoming movie LagnaKallol: पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुख 'लग्नकल्लोळ' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Mayuri Deshmukh
Mayuri Deshmukh

LagnaKallol Trailer: ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. दोन वर्षांपू्र्वी तिच्या पतीचे निधन झाले. आत्महत्या करत मयुरीच्या पतीने जीवन संपवले होते. पती आशुतोषच्या जाण्याच्या धक्क्यातून अभिनेत्री मयुरी देशमुख स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा जोमाने उभे राहण्याचा प्रयत्न करते आहे. आता तिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'लग्नकल्लोळ' असे असून चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच. हाच गोंधळ आपल्याला ‘लग्नकल्लोळ’मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत. यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत. त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला १ मार्चला मिळणार आहे. हा एक रॅामकॅाम चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पाहावा. दरम्यान, या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.
वाचा: 'हा' अभिनेता साकारणार मनोज जरांगे पाटील, चित्रीकरणास सुरुवात

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मयुरी देशमुख, भूषण प्रधान, विद्या करंजीकर, प्रिया बेर्डे, प्रतीक्षा लोणकर, सुप्रिया कर्णिक, अमिता कुलकर्णी, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे.

IPL_Entry_Point