मयूरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे की कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी पाहायला मिळणार हा चित्रपट. चला जाणून घेऊया...
'लग्नकल्लोळ' या चित्रपटात श्रुती आणि अथर्व यांची कथा दाखवण्यात आली आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम असते आणि ते लग्न करुन संसार थाटणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण देखील आहे. पण तिच्या आयुष्यात सगळे काही चुकीचे सुरु आहे. तिचा संसार हा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे. त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळे वळण मिळेल? याविषयी जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहाव लागणार आहे.
वाचा: ओंकार भोजने दिसणार महेश मांजरेकरांसोबत, सिनेमाच्या पोस्टने वाढवली उत्सुकता
अनेक नवे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असतात. आता मराठी चित्रपट देखील प्रदर्शित होताना दिसत आहेत. आता यामध्ये लग्नकल्लोळ या चित्रपटाचा देखील समावेश झाला आहे. हा चित्रपट अल्ट्रा मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट ओटीटीवर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.
वाचा: 'नमस्कार वहिनी', फोटोग्राफर्सने आवाज देताच आलियाने दिली अशी प्रतिक्रिया
'लग्नकल्लोळ' या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर, मयुरी देशमुख आणि सुप्रिया कर्णिक हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच त्यांच्यासोबत प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे यांनी स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी केले आहे.
वाचा: कसा आहे करीना आणि तब्बूचा 'क्रू' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
या चित्रपटाविषयी बोलताना अल्ट्रामराठीचे सीईओ म्हणाले, “नवा विषय आणि नवा आशय असणारा ‘लग्न कल्लोळ’ चित्रपट आणि त्यातील भन्नाट कलाकार प्रेक्षकांचं भन्नाट मनोरंजन करीत आहेत. आम्ही या चित्रपटासोबतच येत्या काळात अनेक विविध आशय विषय असलेले मराठी चित्रपट घेऊन येणार असून प्रेक्षकांचं शाश्वत मनोरंजन करणार आहोत.”
संबंधित बातम्या