Matichya Chuli: ‘मातीच्या चुली’ सिनेमात एकाच भूमिकेत दिसले दोन कलाकार, नेमकं काय झालं होतं?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Matichya Chuli: ‘मातीच्या चुली’ सिनेमात एकाच भूमिकेत दिसले दोन कलाकार, नेमकं काय झालं होतं?

Matichya Chuli: ‘मातीच्या चुली’ सिनेमात एकाच भूमिकेत दिसले दोन कलाकार, नेमकं काय झालं होतं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 08, 2024 03:51 PM IST

Matichya Chuli: ‘मातीच्या चुली’ सिनेमामध्ये अंकुश चौधरींच्या वडिलांच्या भूमिकेत कधी सुधीर जोशी दिसतात तर कधी आनंद अभ्यंकर. आता नेमकं काय होतं चला जाणून घेऊया…

Matichya Chuli
Matichya Chuli

२००६ मध्ये रिलीज झालेला मातीच्या चुली हा चित्रपट तुम्ही नक्कीच पहिला असेल. सासू सुनेच नात्यामधले युद्ध, त्यात होणारे नवरा आणि सासऱ्यांचे सँडविच अशी मजेदार कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. मात्र हा चित्रपट पाहताना तुम्हाला एक गोष्ट नक्कीच खटकली असेल, चित्रपटात श्रीपाद दांडेकर अशी सासऱ्यांची भूमिका साकारणारा कलाकार चित्रपटाच्या मध्यातच अचानक बदलतो. म्हणजेच चित्रपटाच्या सुरुवातीला या भूमिकेत सुधीर जोशी दिसतात मात्र चित्रपटाच्या अधून मधून अचानक आनंद अभ्यंकर तिच भूमिका साकारताना दिसतात. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

नेमकं काय झालं होतं?

खरतर मातीच्या चुली या सिनेमात या अंकुश चौधरींच्या वडिलांच्या भूमिकेसाठी सुधीर जोशी यांची निवड झाली होती. मात्र दुर्दैवाने चित्रपट अर्धा शूट झाला असताना त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. फिल्म मेकिंग हा तसा खर्चिक व्यवसाय मानला जातो. एखादा चित्रपट अर्धवट शूट झाला असताना एखाद्या कलाकाराचा मृत्यू होणं हे निर्मात्यांसाठी एखाद्या भयानक स्वप्नपेक्षा कमी नाही. त्यात मराठी चित्रपटाचं बजेट हे लिमिटेड असल्याकारणाने पुन्हा दुसरा कलाकार घेऊन शूट करणं हे शक्य नसते.

महेश मांजरेकरांनी लढवली शक्कल

मातीच्या चुली या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांनी केली होती. सुधीर जोशी इनडोअर सिन बऱ्यापैकी शूट झाले होते. आऊटडोअर सिन बऱ्यापैकी बाकी होते. अशावेळी त्यांनी चित्रपट पुन्हा रिशूट न करता, उरलेले सिन हे अभिनेते आनंद अभ्यंकर यांच्याकडून करवून घेण्याचाच निर्णय घेतला. म्हणूनच चित्रपटात घरातील सिन मध्ये तुम्हाला सुधीर जोशी आढळतील तर आऊटडोअर सिन मध्ये आनंद अभ्यंकर दिसून येतात. चित्रपट पूर्ण झाल्यावर दोन्ही कलाकारांचे डायलॉग अभिनेते सचिन खेडेकर यांनी डब केले होते.

२०२२मध्ये एका चित्रपटासोबत सेम घडले

खरतर चित्रपटांच्या इतिहात असं पहिल्यांदाच घडत होतं. २०२२ मध्ये रिलीज झालेला शर्माजी नमकीन हा चित्रपट देखील आहे पद्धतीने शूट करण्यात आला होता. ऋषी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या शूटदरम्यानच ऋषी कपूर यांचं अकस्मात निधन झालं. त्यामुळे चित्रपटातील उर्वरित सिन हे परेश रावल यांच्याकडून चित्रित करण्यात आले होते.
वाचा: सूरज चव्हाणवर आली सिमेंटच्या गोणी उचलण्याची वेळ, गावात राबतानाचा व्हिडीओ व्हायरल

हॉलिवूड अपवाद

अशा घटनांमध्ये हॉलिवूड मात्र अपवाद ठरला. फास्ट अँड फुरीयस ७ या चित्रपटाचे शूट दरम्यान चित्रपटात ब्रिएन ही भूमिका साकारणाऱ्या पॉल वॉकर या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू झाला. अशावेळी निर्मात्यांनी कलाकार रिप्लेस करण्याऐवजी चक्क CGI च्या मदतीने पॉल वॉकरचे थ्रिडी मॉडेल बनवून चित्रपट सिन शूट केले

Whats_app_banner