मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Masterchef India: मास्टरशेफमध्ये सहभागी व्हायचं? जाणून घ्या कसं

Masterchef India: मास्टरशेफमध्ये सहभागी व्हायचं? जाणून घ्या कसं

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 23, 2022 12:38 PM IST

Masterchef India Season 7: तुमच्या शहरात कधी होणार ऑडिशन? पाहा वेळापत्रक

मास्टर शेफ इंडिया
मास्टर शेफ इंडिया (HT)

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच आवडता शो म्हणजे मास्टरशेफ इंडिया. हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण हा शो पाहात असताना अनेक प्रेक्षकांच्या मनात आपणही शोमध्ये सहभागी व्हायला हवे होते अशी कुरुकुर सुरु होते. आता नव्या आणि उत्साही शेफ्सच्या पाककौशल्याद्वारे हा शो प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. मास्टरशेफ लवकरच भारताच्या मास्टरशेफला शोधण्याची मोहीम सुरू करणार असून त्यासाठीच्या ऑडिशन्सची सुरुवात कोलकाता येथून होणार आहे. त्यानंतर मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली इथे या प्रवेशफेऱ्या पार पडणार आहेत.

तुमच्या ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त आणि फक्त खाद्यपदार्थांची पंगत असेल आणि तुमचे आयुष्य पाककृतींच्या अवतीभोवती फिरत असेल तर अनुक्रमे २४ सप्टेंबर, १५ ऑक्टोबर आणि ८ ऑक्टोबर रोजी खालील ठिकाणी होणाऱ्या ऑडिशन्समध्ये सामील व्हा.

•कोलकात्यामधील ऑडिशन्स २४ सप्टेंबर रोजी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, पी-१६, तारातला रोड, सीपीटी कॉलनी, अलीपोर, कोलकाता, पश्चिम बंगाल ७०००८८ येथे पार प़डणार आहेत.

•दिल्‍ली ऑडिशन्‍स १ ऑक्‍टोबर रोजी हॅप्‍पी मॉडेल स्‍कूल, बी२, जनकपुरी, नवी दिल्‍ली ११००५८ येथे घेण्‍यात येतील.

•मुंबईतील ऑडिशन्स १५ ऑक्टोबर रोजी रायन इंटरनॅशनल स्कूल, वास्तू पार्क, ऑफ लिंकिंग रोड, मालाड, एव्हरशाइन नगर, मालाड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००६४ येथे सुरू होणार आहेत.

•हैदराबादमधील ऑडिशन्स ६ ऑक्टोबर रोजी सेंट. अॅन्स कॉलेज फॉर विमेन, ए/७५, सेंट अॅन्स रोड, संतोष नगर, मेहदीपटनम, हैदराबाद, तेलंगणा ५०००२८ येथे सुरू होणार आहेत.

विविध शहरांतील ऑडिशन्स पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष शोमध्ये देशभरातील शेफ्स स्पर्धेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. तेव्हा रंगमंच सिद्ध झाला आहे आणि आता परीक्षक मंडळी उत्साहाने भारलेल्या, मनातील उर्मीला साद देणाऱ्या, प्रतिभाशाली पाककुशल जाणकार मंडळींना मास्टरशेफ इंडियाच्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग