मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला

पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 03, 2024 06:56 PM IST

‘मास्टरशेफ इंडिया’ फेम कुणाल कपूर याने नुकताच पत्नीच्या त्रासाला कंटाळून हायकोर्टात धाव घेतली आहे. लग्नाच्या जवळपास १६ वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे. पण घटस्फोट घेताना कुणालने पत्नीवर अनेक अरोप केले आहेत.

पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला
पत्नीच्या त्रासाला कंटाळून शेफ कुणाल कपूर याने घेतला घटस्फोट, १६ वर्षांचा संसार मोडला

सेलिब्रिटींच्या आयुष्यात अफेअर, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट या अगदी सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत. नुकताच ‘मास्टरशेफ इंडिया’ या लोकप्रिय कार्यक्रमातला परीक्षक आणि सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने पत्नीला घटस्फोट दिसा आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून कुणालने दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्याचे म्हटले जात आहे. मंगळवारी हायकोर्टाने कुणाल कपूरने पत्नीवर केलेल्या क्रूरतेच्या आरोपावर आधारित घटस्फोटाची याचिका मंजूर केली. तसेच कुणालला पत्नीकडून मिळणारी वागणूक चुकीची असल्यामुळे हायकोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजुर केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जवळपास लग्नाच्या १६ वर्षांनंतर कुणालने पत्नीला घटस्फोट दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी कुणालच्या पत्नीने त्याचा अनेकदा अपमान केला होता. पत्नीकडून मिळणारी ही वागणूक क्रूरतेचे प्रतिक असल्याचं हायकोर्टाने सांगितले आहे. हायकोर्टाने सांगितले की, कुणालच्या पत्नीचे वर्तन चुकीचे आहे. तिला पतीच्या प्रतिष्ठेची अजिबात काळजी नाही आणि तसेच त्याच्या प्रति जराही सहानुभूती नाही. कोर्टाच्या मते, जेव्हा पती-पत्नीमधील एकाची वृत्ती अशी असते तेव्हा त्याचा परिणाम नात्यावर होता. त्यामुळे त्यांना एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही.
वाचा: गौरी नलावडेने शेअर केला बिकिनी फोटो, ऋतुजा बागवेच्या फ्लर्टी कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

कुणालची दिल्ली कोर्टात धाव

कुणाल कपूरने घटस्फोट घेण्यासाठी दिल्लीतील कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्याची ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली. त्यानंतर कुणालने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने या याचिकेवर, “कुणालच्या पत्नीचे वर्तन हे विवाह कायद्याचा कलम १३ (१) अंतर्गत येते. त्यामुळे फॅमिली कोर्टाने कुणालची घटस्फोटाची याचिका फेटाळून चुकी केली आहे” असे मत मांडले. आता हायकोर्टाने त्याची याचिका मान्य केली असून त्यांचा घटस्फोट झाला आहे.
वाचा: शाहरुखचा लेक ‘या’ परदेशी अभिनेत्रीला करतोय डेट? चर्चांना उधाण

१६ वर्षांचा संसार मोडला

कुणालने १६ वर्षांपूर्वी लग्न केले होते. सुरुवातीला त्यांचा संसार मस्त सुरु होता. पण काही दिवसांनंतर कुणाल आणि त्याच्या पत्नीमध्ये खटके उडू लागले. त्याची पत्नी सार्वजनिक ठिकाणी त्याचा अपमान करु लागली. त्यामुळे कुणालने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

वाचा: आनंदी-सार्थकचा पार पडणार विवाहसोहळा; ‘मन धागा धागा जोडते’मध्ये नवा ट्विस्ट

कुणाल कपूरविषयी

कुणाल कपूरचा जन्म दिल्लीत झाला. त्याचे संपूर्ण शिक्षण देखील दिल्लीत झाले आहे. बालपणापासूनच कुणालला जेवण बनवण्याची आवड होती. तो सतत नवनवीन पदार्थ बनवून कुटुंबीयांना खायला घालायचा. आज कुणालचे स्वत:चे युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलवर तो नवनवीन पदार्थ बनवतानाचे व्हिडीओ शेअर करत असतो.

WhatsApp channel

विभाग