मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  १८ वर्षाची विद्यार्थीनी आणि ५२ वर्षाच्या शिक्षकाचा इंटिमेट सीन, 'मिलर्स गर्ल' सिनेमावर टीका

१८ वर्षाची विद्यार्थीनी आणि ५२ वर्षाच्या शिक्षकाचा इंटिमेट सीन, 'मिलर्स गर्ल' सिनेमावर टीका

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 10, 2024 01:02 PM IST

Millers Girl: नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मिलर्स गर्ल' या चित्रपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. या चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे हे सगळं सुरु असल्याचे दिसत आहे.

Millers Girl
Millers Girl

Millers Girl Intimate Scene: बालकलाकार म्हणून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री जेगा ओर्टेगा सध्या चर्चेत आहे. या चर्चा तिच्या नुकताच प्रदर्शित झालेल्या 'मिलर्स गर्ल' या चित्रपटामुळे सुरु झाल्या आहेत. या चित्रपटात जेगाने अभिनेता मार्टिन फ्रीमॅनसोबत इंटिमेट सीन दिला आहे. या सीनवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिलर्स गर्ल' या चित्रपटाला क्रिटिक्सने नकारात्मक रिव्ह्यू दिला आहे. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कारण चित्रपटात १८ वर्षाची विद्यार्थीनी जेना आणि ५२ वर्षाचा शिक्षक मार्टिन यांची लव्हस्टोरी दाखवून काही इंटिमेट सीन शूट करण्यात आले आहेत. ही गोष्ट प्रेक्षकांना रुचलेली नाही. त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटावर टीका करण्यासा सुरुवात केली आहे.
वाचा: यामी गौतमने चाहत्यांना दिली गुडन्यूज; ‘आर्टिकल ३७०’च्या प्रमोशनदरम्यान दाखवला बेबी बंप!

जेगा ओर्टेगाने नेटफ्लिक्सवरील सीरिज 'वेडनेसडे'मध्ये काम केले आहे. तिला या सीरिजने रातोरात स्टार बनवले. तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत होती. पण यावेळी तिच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी टीका केली आहे.

काय आहे 'मिलर्स गर्ल'ची कथा?

'मिलर्स गर्ल' चित्रपटात २१ वर्षीय जेनाने १८ वर्षाच्या विद्यार्थीनीची भूमिका साकारली आहे. ती ५२ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडते. त्या दोघांच्या नात्यातील चढ-उताराभोवती या चित्रपटाची कथा फिरते. तसेच प्रेमात असताना दोघांमध्ये काही इंटिमेट सीन शूट करण्यात आले आहेत. त्या दोघांच्या वयातील अंतर आणि दाखवण्यात आलेले प्रेम यावर टीका होताना दिसत आहे.

नेटकऱ्यांनी केली टीका

एका यूजरने हा चित्रपट पाहून 'जेगा ओर्टेगाचा सीन आता पाहिला. पण भयानक आहे हे' अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने 'मार्टिन फ्रीमॅनने जेना ओर्टेगाशी लग्न का करेल ती २० वर्षांची आहे' असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'जेगा आणि मार्टिनचा हा चित्रपट अतिशय वाईट आहे. इतका वाईट चित्रपट मी आजपर्यंत पाहिलेला नाही' असे म्हणत जेगाला सुनावले आहे.

WhatsApp channel

विभाग