मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  March Upcoming Movie Release: ‘शैतान’ ते ‘क्रू’; मार्च महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

March Upcoming Movie Release: ‘शैतान’ ते ‘क्रू’; मार्च महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 29, 2024 11:04 AM IST

March Upcoming Movie Release: चित्रपट प्रेमींसाठी मार्च महिना खूप खास असणार आहे. ॲक्शनपासून कॉमेडीपर्यंत अनेक जॉनरचे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत.

March Upcoming Movie Release
March Upcoming Movie Release

March Upcoming Movie Release: चित्रपट प्रेमींसाठी मार्च महिना खूप खास असणार आहे. ॲक्शनपासून कॉमेडीपर्यंत अनेक जॉनरचे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहेत. या यादीत अजय देवगणचा चित्रपट 'शैतान' आणि करीना कपूरच्या 'क्रू'चा देखील समावेश आहे. या चित्रपटांच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मार्च महिन्यात कोणकोणते चित्रपट चित्रपटगृहात रिलीज होणार आहेत? चला जाणून घेऊया...

लापता लेडीज

आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवोदित कलाकारांना घेण्यात आले आहे. किरण राव गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

कागज २

'कागज २' हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या पंकज त्रिपाठी स्टारर चित्रपट 'कागज' चा सिक्वल आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, सतीश कौशिक मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Deepika Padukone Pregnant: कुणी तरी येणारं गं... दीपिका पादुकोण-रणवीर सिंहने शेअर केली गुडन्यूज!

शैतान

अजय देवगण, आर माधवन आणि ज्योतिका स्टारर चित्रपट 'शैतान' येत्या ८ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. काळ्या जादूवर आधारित हा चित्रपट गुजराती चित्रपट 'वश'चा हिंदी रिमेक आहे. नुकताच ‘शैतान’चा ट्रेलर रिलीज झाला, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

योद्धा

सिद्धार्थ मल्होत्रा, राशि खन्ना आणि दिशा पाटनी स्टारर 'योद्धा' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात एका योद्ध्याची कथा दाखवण्यात येणार आहे, ज्याने अपहरण झालेल्या विमानातील अनेक प्रवाशांचे जीव वाचवले. हा चित्रपट १५ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बस्तर- द नक्सल स्टोरी

‘द केरल स्टोरी’चा दिग्दर्शक सुदीप्तो सेन त्याचा आगामी चित्रपट 'बस्तर-द नक्सल स्टोरी' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, यामध्ये अभिनेत्री नक्षलवाद्यांशी लढताना दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट १५ मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

स्वातंत्र्य वीर सावरकार

अभिनेता रणदीप हुड्डा याचा आगामी चित्रपट 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असून, तो या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट मोठा धमाका ठरू शकतो. हा चित्रपट २२ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

क्रू

करीना कपूर, क्रिती सेनन आणि तब्बू स्टारर 'क्रू'चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकता कपूर आणि रिया कपूर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

WhatsApp channel

विभाग