Marathi Natak: 'आपण यांना पाहिलंत का?' धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर-marathi upcoming natak apan yana pahilet ka ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Natak: 'आपण यांना पाहिलंत का?' धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

Marathi Natak: 'आपण यांना पाहिलंत का?' धमाल नाटक लवकरच रंगभूमीवर

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 20, 2023 10:35 AM IST

Apan Yana Pahilet Ka: दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली असल्यामुळे त्यांनी प्रेक्षकांना भेट स्वरुपी हे नाटक आणलं आहे.

Apan Yana Pahilet Ka
Apan Yana Pahilet Ka

सध्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी सुगीचे दिवस असल्याचे पाहायला मिळते. 'वेड' चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट आणि नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळते. या सगळ्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. आता एक नवे नाटक 'आपण यांना पाहिलंत का?' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाची सर्वजण आतुरतेने वाट पाहाता आहेत.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर दिग्दर्शनाची शंभरी पार केली आहे आणि आता 'आपण यांना पाहिलंत का?' हे नवं खुसखुशीत नाटक ते लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहे.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने वयाच्या १६व्या वर्षी केला आयुष्याचा शेवट

विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. कसदार दिग्दर्शनातून नेमक्या पद्धतीनं आजच्या काळावर ते नाटकातून भाष्य करतात. त्यातच पती-पत्नी, नातेसंबंध हा विषय प्रत्येक काळात कालसुसंगत असतो. त्यामुळे 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकात आता काय धमाल अनुभवायला मिळणार याची उत्सुकता आहे.

या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. वैवाहिक आयुष्याची बरीच वर्षेसोबत काढल्यावर नवरा बायको नकळतपणे एकमेकांना ग्राह्य धरू लागतात. ते सुखी तर असतात, पण त्यांच्या संसारात पोकळी नेहमी जाणवत राहत असते, ती पोकळी कोणी एक व्यक्ती भरून काढतं, ती व्यक्ती त्या जोडप्यांच्या संसारात कधी कधी दिसते, तर कधी नाही दिसत, पण त्या व्यक्तीच्या असण्याने जो संसार कंटाळवाणा झालाले आहे तो अचनाकपणे ताजातवाना होतो. त्याच्या येण्याने जी काही गंमत संसारात होऊ शकते ती सर्व गंमत 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Whats_app_banner
विभाग