दोन दिवसांपूर्वी मुंबईतील वरळी येथे झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाने सर्वांना हादरुन टाकले आहे. या अपघातामध्ये ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचे पती प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीरचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणावर आता गायक उत्कर्ष शिंदेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, “फार फार तर उद्या ‘सिम्बा’… ‘सिंघम’…’सूर्यवंशी’सारख्या चित्रपटांची सुरुवात अशाप्रकारच्या अपघाताने होईल आणि फिल्मी न्याय फक्त त्या चित्रपटात मिळेल. सत्यात न्याय देणारे… न्याय मिळू देणार नाहीत. मराठीचा टेंभा मिरवणारे मराठी माणसाला न्याय मिळवून देतील का? आता होईल ती दुकानदारांची ‘सेटलमेंट” असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
वाचा : पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
समोर आलेल्या माहितीनुसार, वरळी येथे झालेल्या अपघातानंतर मिहिर शाह हा फरार झाला होता. आता त्याला शहापूरमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत मृत पावलेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणी लागत होत्या. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्यापाठोपाठ गायक उत्कर्ष शिंदेने देखील संताप व्यक्त केला आहे.
वाचा : सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळी कोळीवाडा येथे राहणारे नाकवा दाम्पत्य सकाळी मासे खरेदीसाठी ससून डॉकला गेले होते. दुचाकीवर परतत असताना वरळीतील अट्रिया मॉलजवळ त्यांना भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने धडक दिली. धडक दिल्यानंतर गाडी चालवणारा मिहिर शाह तेथून पळून गेला. या भीषण अपघातामध्ये प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले. पण त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला.
वाचा : या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू
संबंधित बातम्या