मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून ओळख असलेल्या अवधूत गुप्तेच्या आईचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अवधूतच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान अवधूतच्या आईचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईच्या व्होकार्ट रुग्णालयात अवधूत गुप्तेच्या आईवर उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्याच्या आईचे निधन झाले आहे. अंत्यदर्शनानंतर दौलतनगर स्मशानभूमी , बोरिवली ईस्ट येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे. अवधूतच्या आईला नेमके काय झाले होते याबाबतची माहिती समोर आलेली नाही. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अवधूतची भेट घेत त्याचे सांत्वन केले आहे.
वाचा: शाहरुखचा लेक आर्यन खान ऑरीसोबत फोटो काढताना कधीच हासत नाही, काय आहे कारण?
अवधूत गुप्तेच्या आईचे नाव मृदगंधा गुप्ते असे होते. अवधूत हा आईच्या अगदी जवळ होता. त्याने अनेक मुलाखतीमध्ये आईसोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केले होते. तसेच आई ही माझी पहिली मैत्रिण आहे असे देखील अवधूत म्हणाला होता. आता आईच्या निधनाने अवधूतला मोठा धक्का बसला आहे. अनेक कलाकार त्याचे भेटून सांत्वन करत आहेत.
(सविस्तर बातमी अपडेट होत आहे.)
संबंधित बातम्या