मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Serial Update: अनिरुद्ध घुसणार अरुंधतीच्या घरात; अप्पा लगावणार त्याच्या कानशिलात
आई कुठे काय करते
आई कुठे काय करते
25 June 2022, 13:32 ISTPayal Shekhar Naik
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
25 June 2022, 13:32 IST
  • (aai kuthe kay karte)आता आप्पा पुढे कोणतं पाऊल उचलतात. ते याबद्द्दल अरुंधतीला सांगणार का? अरुंधती यावर काय निर्णय घेणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्यातही अरुंधती ही तर सगळ्यांची लाडकी आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. सध्या मालिकेत अरुंधतीची प्रगती दाखवण्यात येत आहे. कधीही एकटी घराबाहेर न गेलेली अरुंधती आता एकटीने विमान प्रवास करते आहे. अरुंधतीच्या या प्रवासाने अनेक स्त्रियांना त्यांच्या आयुष्यात देखील आणखी बरंच काही करण्याचं बळ मिळत आहे. सोबतच मालिकेत आता पुढे काय दिसणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लवकरच अनिरुद्ध आणि आप्पांमध्ये मोठा वाद झालेला पाहायला मिळणार आहे. अनिरुद्धने अरुंधतीच्या घराची चावी चोरून मिळवली आहे. आणि कुणालाही न सांगता तो गुपचूप तिच्या घरी जाणार आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या घरी तिचे आणि आशुतोषच्या नात्याबद्दलचे काही पुरावे मिळवायला जाणार आहे. मात्र अनिरुद्धकडे असलेल्या चावीबद्दल संजनाला माहित आहे. त्यामुळे तो तिकडे गेल्यावर संजना आप्पा आणि यशला घेऊन तिथे पोहोचणार आहे. अनिरुद्धला अरुंधतीच्या घरी पाहून आप्पांचा रागाचा पारा चढणार आहे. आणि ते अनिरुद्धच्या कानशिलात लागवणार आहेत. ते त्याला जाब विचारणार आहेत.

आता आप्पा पुढे कोणतं पाऊल उचलतात. ते याबद्द्दल अरुंधतीला सांगणार का? अरुंधती यावर काय निर्णय घेणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग