नव्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात मारली बाजी! या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका कोणत्या? पाहा TRP Report
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नव्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात मारली बाजी! या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका कोणत्या? पाहा TRP Report

नव्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात मारली बाजी! या आठवड्याच्या टॉप ५ मराठी मालिका कोणत्या? पाहा TRP Report

Published Jun 07, 2024 11:28 AM IST

सध्या काही नव्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यापैकी एका नव्या कोऱ्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टॉप ५मध्ये बाजी मारली आहे.

नव्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात मारली बाजी!
नव्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात मारली बाजी!

मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट म्हटलं की सगळ्यांनाच खूप आतुरता असते. प्रत्येक आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या मराठी मालिका टॉप ५मध्ये सामील होतात. सध्या काही नव्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यापैकी एका नव्या कोऱ्या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टॉप ५मध्ये बाजी मारली आहे. २०२४च्या २२व्या आठड्यात प्रेक्षकांच्या कोणत्या आवडत्या मालिकांनी सर्वाधिक रेटिंग मिळवत टॉप ५मध्ये जागा मिळवली आहे, चला बघूया...

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या रंजक वळण आलेलं पाहायला मिळालं आहे. या मालिकेने पुन्हा या आठवड्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेला ६.९चा टीआरपी रेट मिळाला आहे. या मालिकेत सध्या सायली आणि अर्जुन बाळाची स्वप्न रंगवताना दिसत आहे. मात्र, त्यांची ही स्वप्न कधी पूर्ण होऊ शकतील की, नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने सध्या प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या मालिकेने टीआरपीमध्ये आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेला ६.७चे रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या कला समोर आपल्या आई वडिलांना काय कष्ट कारावे लागत आहेत, हे समोर आले आहे. आता कला यावर काय निर्णय घेणार आणि पुढे काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

करण जोहर-सलमान खान नव्हे, ‘Bigg Boss OTT 3’ची धुरा सांभाळणार अनिल कपूर! कधीपासून सुरू होणार शो?

प्रेमाची गोष्ट

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहेत. या मालिकेला टीआरपीमध्ये तिसरं स्थान मिळालं आहे. या मालिकेने २२व्या आठवड्यात ६.४ रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या सावनी सध्या मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यात वादळ आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे लवकरच कळणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे

‘तुझे मी गीत गात आहे’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे. या मालिकेला टीआरपी शर्यतीत चौथं स्थान मिळालं आहे. ‘तुझे मी गीत गात आहे’ या मालिकेला २२व्या आठवड्यात ६.४चा टीआरपी रेटिंग मिळाली आहे. या मालिकेत सध्या वैदही आणि मोनिकाच्या वादात मल्हारला दुखापत झाली आहे. तर, मोनिका आंधळी असल्याचं नाटक करत असल्याचं समोर येणार आहे.

येड लागलं प्रेमाचं

नव्यानेच दाखल झालेल्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टॉप ५मध्ये जागा मिळवली आहे. या मालिकेला पहिल्याच आठवड्यात ५.८चा टीआरपी मिळाला असून या मालिकेने पाचवं स्थान मिळवलं आहे. या मालिकेत सध्या एक नवं आणि हटके कथानक पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner