मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Serial TRP: नव्या वर्षात कोणत्या मालिकेने मारली बाजी? पाहा काय म्हणतोय टीआरपी रिपोर्ट...

Marathi Serial TRP: नव्या वर्षात कोणत्या मालिकेने मारली बाजी? पाहा काय म्हणतोय टीआरपी रिपोर्ट...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 11, 2024 02:04 PM IST

Marathi Serial TRP Report Week 1: नव्या वर्षात देखील मालिकांचा जलवा पाहायला मिळत आहे. नुकताच नव्या वर्षातील पहिल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे.

Marathi Serial TRP
Marathi Serial TRP

Marathi Serial TRP Report Week 1: गतवर्ष मराठी मालिकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं ठरलं आहे. गेल्या वर्षी अनेक धमाकेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. आता नव्या वर्षात देखील मालिकांचा जलवा पाहायला मिळत आहे. नुकताच नव्या वर्षातील पहिल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. यात पुन्हा एकदा जुन्याच मालिकांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. चला तर बघूया कोणत्या मालिकेने मारली बाजी...

ठरलं तर मग

अर्जुन आणि सायलीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रथम क्रमांकावर टिकून राहण्याचा मान पटकावला आहे. एखाद-दुसऱ्या आठवड्यात हे स्थान घसरलं होतं. मात्र, पुन्हा एकदा या मालिकेने आपलं स्थान बळकावलं आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात देखील ‘ठरलं तर मग’ ही मालिका पहिल्या स्थानावर आहे.

प्रेमाची गोष्ट

मुक्ता आणी सागर यांच्या लग्नामुळे आता ‘प्रेमाची गोष्ट’ टीआरपीच्या शर्यतीत धावत आहे. या मालिकेने नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दुसरं स्थान पटकावलं आहे. मुक्ता आता लग्न करून सागरच्या घरात आली आहे. आता सागरच्या घरात रोजच नवा हंगामा पाहायला मिळत आहे.

Tu Chal Pudha: अश्विनीला सोडून श्रेयस मीराशी लग्नगाठ बांधणार? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

आई कुठे काय करते

टीआरपीच्या शर्यतीत ‘आई कुठे काय करते’ ही मालिका चांगलीच लढत देताना पाहायला मिळते. अनेक नव्या मालिकांना मागे टाकून ‘आई कुठे काय करते’ने आपली जागा टिकवून ठेवली आहे. या मालिकेने नवीन वर्षात देखील तिसरा क्रमांक पटकावला आजे.

सुखं म्हणजे नक्की काय असतं

एखाद्या चित्रपटाला शोभेल असं कथानक सध्या ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. सध्या या मालिकेत गौरी आणि जयदीप यांचा पुनर्जन्म पाहायला मिळत आहे. या पुनर्जन्माच्या कथानकामुळे मालिकेत रंगत आली आहे. ही मालिका पहिल्या आठवड्यात चौथ्या स्थानावर आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत तीन भावांची कथा पाहायला मिळत आहे. आता या तीन भावांचं आयुष्य तीन बहिणींशी जोडलं जाणार आहे. यामुळेच कथानक रंजक झालं आहे. ही मालिका सध्या पाचव्या स्थानावर आहे.

WhatsApp channel

विभाग