मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

May 18, 2024 08:46 AM IST

या आठवड्यात पुन्हा एकदा सायलीच्या ‘ठरलं तर मग’ने आणि कलाच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांनी पुन्हा एकदा टीआरपीमध्ये बाजी मारली आहे.

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report
पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

आठवडाभर प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत असतात, तो म्हणजे मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट! या आठवड्याचा म्हणजेच २०२४च्या १९व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा सायलीच्या ‘ठरलं तर मग’ने आणि कलाच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकांनी पुन्हा एकदा टीआरपीमध्ये बाजी मारली आहे. याचाच अर्थ या मालिका प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्यात यशस्वी ठरल्या आहेत. चला पाहूया या आठवड्यात टॉप ५ मालिकांमध्ये कोणी मारले आहे बाजी...

ट्रेंडिंग न्यूज

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायली यांच्यातील दुरावा पाहायला मिळत आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत आल्यामुळे आता सायली अर्जुनच्या घरातून बाहेर पडणार आहे. दुसरीकडे, अर्जुन आणि सायली यांना मधुभाऊंच्या केसमध्ये अतिशय महत्त्वाचा पुरावा सापडणार आहे. तुरुंगात असलेल्या महिपतकडे मोबाईल असून, तो मधुभाऊंच्या केसविषयी काहीतरी बोलत होता, अशी माहिती चैतन्य अर्जुन आणि सायलीला देणार आहे त्यामुळे आता या मालिकेला वेगळा ट्विस्ट येताना दिसणार आहे. या मालिकेने ६.९चा टीआरपी मिळवत पहिला नंबर पटकावला आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलां’नी या मालिकेत आता कला आणि अद्वैत यांच्यातील जवळीक पाहायला मिळत आहे. कला आणि अद्वैत यांनी राहुल आणि नैना यांचं लग्न लावून दिले आहे. त्यानंतर आता कला आणि अद्वैत यांच्यातील वैर मैत्रीत बदलताना दिसत आहे. कलाच्या खोलीत काम सुरू असल्याने आता तिला जबरदस्ती अद्वैतसोबत रूम शेअर करायला लागणार आहे. तर, अद्वैत कलाला एका वेगळ्याच रूममध्ये बंद करून ठेवणार आहे. दोघांमधील ही प्रेमळ भांडणं बघायला प्रेक्षकांना देखील आवडत आहे. या मालिकेने ६.६चा टीआरपी मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे.

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

प्रेमाची गोष्ट

तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने ६.५चा टीआरपी मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका तिसऱ्या स्थानावर टिकून राहिली आहे. या मालिकेत सध्या मुक्तावर वेगवेगळे आरोप होताना दिसत आहेत. यामुळे मुक्त आणि सागर यांच्यातील दुरावा वाढत आहे. मात्र, मुक्त या सगळ्यात निर्दोष आहे, हे आता सागर सिद्ध करणार आहे. दुसरीकडे, मुक्ताच्या आईची तब्येत खराब झाली आहे. आईच्या या अवस्थेमागे कुणाचा हात आहे, हे मुक्ता आता शोधून काढणार आहे.

निशी आणि नीरजला वेगळं करण्याचा मेघनाचा डाव सफल होणार? ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार ट्वीस्ट

तुझेच मी गीत गात आहे

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने देखील प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या मालिकेने १९व्या आठवड्यात ६.१चा टीआरपी मिळवत चौथे स्थान पटकावले आहे. या मालिकेत वैदही जिवंत असल्याचं सत्य आता स्वरासमोर येणार आहे. तर, मोनिका देखील आंधळी झालेली नसून, तिला सगळं काही दिसत आहे हे सत्य आता स्वरा सगळ्यांसमोर आणणार आहे. या सगळ्यातून स्वरा आपल्या आईला वाचवू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

घरोघरी मातीच्या चुली

नव्याने छोटा पडद्यावर दाखल झालेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. ५.६चा टीआरपी मिळवत या मालिकेने पाचवे स्थान पटकावले आहे. या मालिकेत नुकताच ऐश्वर्या आणि सारंग यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला. दुसरीकडे, सौमित्रवर आलेलं संकट आता टळलं आहे. मात्र, ऐश्वर्या आता या कुटुंबाला आणखी त्रास देण्यासाठी नवनवे प्लॅन्स आखताना दिसणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग