सायली आणि मुक्तानेच मारली बाजी! पाहा ‘या’ आठवड्यात टीआरपीमध्ये ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या?-marathi serial trp report list week 12 top 5 marathi serial tharala tar mag secure first place again ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायली आणि मुक्तानेच मारली बाजी! पाहा ‘या’ आठवड्यात टीआरपीमध्ये ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या?

सायली आणि मुक्तानेच मारली बाजी! पाहा ‘या’ आठवड्यात टीआरपीमध्ये ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या?

Apr 02, 2024 10:28 AM IST

नुकताच गेल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. यात चार मालिका आणि एका पुरस्कार सोहळ्याने बाजी मारली आहे.

सायली आणि मुक्तानेच मारली बाजी! पाहा ‘या’ आठवड्यात टीआरपीमध्ये ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या?
सायली आणि मुक्तानेच मारली बाजी! पाहा ‘या’ आठवड्यात टीआरपीमध्ये ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या?

मराठी मालिका विश्वात आता काही मालिकांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यांपासून काही नव्या मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. मात्र, जुन्या मालिकांनी आपली स्थानं टिकवून ठेवली आहेत. नुकताच गेल्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट जाहीर करण्यात आला आहे. यात चार मालिका आणि एका पुरस्कार सोहळ्याने बाजी मारली आहे. चला तर बघूया २०२४च्या १२व्या आठवड्यात कोणत्या मालिकांनी प्रेक्षकांचं पसंती मिळवली आहे.

ठरलं तर मग

नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा या आठवड्यात ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिलं स्थान पटकावलं आहे. अर्जुन आणि सायली यांच्यातील जवळीक सध्या मालिकेचा आकर्षण बिंदू ठरली आहे. अर्जुन आणि सायलीची प्रेम कथा बघण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर झाले असून, ते ही मालिका आवर्जून बघत आहेत. या आठवड्यात ‘ठरलं तर मग’ या मालिकेने ७.१चं रेटिंग मिळवत टीआरपी शर्यतीत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे.

प्रेमाची गोष्ट

मुक्ता आणि सागरमध्ये आता कुठे प्रेमाचं नातं निर्माण होत होतं, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडत होते. मात्र, सागरच्या एका वक्तव्यामुळे मुक्ताच्या मनाला ठेच लागली आहे. आदित्यचं मन जिंकून घेण्यासाठी सागर आपण मुक्तासोबत केवळ प्रेमाचं नाटक करत असल्याचं म्हणाला आहे. तर, सागरच्या तोंडून हीच गोष्ट स्वतः मुक्ताने ऐकली आणि तिला खूप वाईट वाटलं आहे. सागरवर विश्वास ठेवणारी मुक्ता आता त्याच्यापासून काहीशी दुरावली आहे. त्यांच्या दुराव्याची ही गोष्ट देखील प्रेक्षकांना आवडत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने ६.८ इतका टीआरपी मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे.

छप्परफाड कमाई करणाऱ्या ‘क्रू’ चित्रपटासाठी करीना कपूर आणि इतर कलाकारांना किती पैसे मिळाले? वाचा...

टीआरपी शर्यतीत तिसऱ्या स्थानावर यंदा कुठली मालिका नसून, एका पुरस्कार सोहळ्याचे प्रक्षेपण आहे. नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ हा सोहळा पार पडला. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना घरबसल्या टीव्हीवर पाहता आला. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात वर्षभरात उत्कृष्ट ठरलेल्या मालिका आणि कलाकारांचा गौरव केला जातो. यंदाच्या वर्षी या सोहळ्याने टीआरपी शर्यतीत बाजी मारली आहे. ६.८चा टीआरपी मिळवत, ‘स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२४’ या कार्यक्रमाने टीआरपी शर्यतीत तिसरं स्थान पटकावलं आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैत आणि कला आता राहुलच्या वागण्यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल आणि नैनामध्ये नेमकं काय नातं आहे आणि असं काय झालं ज्यामुळे नैनाने लग्न मोडलं, याचा शोध अद्वैत घेत आहे. तर, या शोधात कला त्याची मदत करत आहे. या दरम्यान आता दोघांमधील जवळीक वाढत आहे. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने ६.५ इतका टीआरपी मिळवत या आठवड्यात चौथे स्थान पटकावले आहे.

कधीकाळी टेलिफोन बूथवर काम करणारा कपिल शर्मा आज कमावतोय कोट्यवधी! वाचा त्याच्या प्रवासाबद्दल...

घरोघरी मातीच्या चुली

नव्याने सुरू झालेल्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. हृषिकेश आणि जानकी यांच्या कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. ‘कहानी घर घर की’ या मालिकेशी काहीस साधर्म्य असणारं हे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. सध्या या मालिकेत सौमित्रच्या लग्नासाठी जानकी आणि हृषिकेश ऐश्वर्याचं स्थळ घेऊन आलेले पाहायला मिळत आहे. मात्र, सौमित्रला ऐश्वर्याशी लग्न करायचं नाही. पहिल्याच आठवड्यात ६.४चा टीआरपी मिळवत, या मालिकेने टीआरपी शर्यतीत एंट्री तर मिळवलीच आणि पाचवं स्थान देखील पटकावलं आहे.