Marathi Serial TRP Report: सध्या मराठी मालिकांमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकांच्या कथानकात आलेल्या काही अनपेक्षित बदलांमुळे प्रेक्षकांना देखील मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. नुकताच मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा नेहमीच्याच मालिकांचा जलवा पाहायला मिळाला आहे. केवळ काही मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवत पुढचं स्थान गाठलं आहे. चला तर, बघूया तुमच्या आवडत्या मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट...
‘ठरलं तर मग’ मालिकेचं कथानक सध्या रोजच वेगवेगळं वळण घेताना दिसत आहे. एकीकडे सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात आलेला दुरावा, तर दुसरीकडे त्यांच्यात फुलणारं प्रेम यांनी कथानकाला एक वेगळी कलाटणी दिली आहे. यामुळे मालिकेला देखील रंगत आली आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेने दुसऱ्या आठवड्यातही आपला पहिला नंबर कायम ठेवला आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्री प्रधान हिने धमाकेदार कमबॅक केला आहे. या मालिकेतील सागर आणि मुक्ताची प्रेमळ भांडणं आता प्रेक्षकांना आवडू लागली आहेत. या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेने दुसऱ्या आठवड्यात दुसरं स्थान पटकावलं आहे.
वैदहीच्या खुनाचं रहस्य आणि मोनिकाचा कपटी डाव आता सगळ्यांसमोर आला आहे. तर, दुसरीकडे आता स्वराला मल्हारकडून वडिलांसारखं प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाला देखील प्रेक्षकांची पसंतीची पावती दिली आहे. या मालिकेने तिसरं स्थान पटकावलं आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेची सध्या प्रेक्षकांमध्ये भरपूर चर्चा आहे. या मालिकेचे काही सीन त्रोल देखील झाले होते. नुकताच मालिकेचा महाएपिसोड देखील पार पडला. या मालिकेने टीआरपी शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा टीआरपी घसरला असून, ही मालिका सध्या पाचव्या स्थानावर आहे. या मालिकेच कथानक इतक्या गुंतागुंतीचं झालं आहे की, प्रेक्षक देखील कन्फुज झाले असावेत. सध्या या मालिकेत यश आणि आरोही यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. मात्र, संजना हिला हे नातं मान्य नाही. यशने गौरीशी नातं जोडलं होतं. गौरी निघून गेली तरी त्याने दुसऱ्या मुलीचा विचार करू नये, असे तिचे मत आहे.
संबंधित बातम्या