मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर? पाहा मराठी मालिकांचा TRP Report

‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर? पाहा मराठी मालिकांचा TRP Report

Jun 15, 2024 01:14 PM IST

२०२४च्या २३व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये २३आठवड्यात कोणत्या मालिकांनी बाजी मारली हे पाहायला मिळत आहेत.

‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर?
‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल; तेजश्री प्रधानची मालिका कितीव्या स्थानावर?

या वर्षी मनोरंजन विश्वात मालिकांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक नव्याकोऱ्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या दरम्यान टीआरपी शर्यतीत देखील चढाओढ पाहायला मिळत आहे. २०२४च्या २३व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. यामध्ये २३आठवड्यात कोणत्या मालिकांनी बाजी मारली हे पाहायला मिळत आहेत. चला तर बघूया कोणत्या मालिकांनी मारलीये ‘टॉप ५’मध्ये बाजी...

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून आपला पहिला नंबर टिकवून राहिली आहे. या आठवड्यातही मालिकेने ६.८चा टीआरपी मिळवून आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. या मालिकेत सध्या धक्कादायक वळण पाहायला मिळत आहे. एकीकडे मधुभाऊंची केस सुटण्याच्या मार्गावर असतानाच साक्षीला चैतन्य, अर्जुन आणि सायलीचा खेळ कळल्याने तिने आता मोठा पलटवार केला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी आणि साक्षीला शिक्षा घडवण्यासाठी सायली, अर्जुन आणि चैतन्य आपली कंबर कसणार आहेत.

साक्षीच्या खेळीने फिरवला डाव; चैतन्य-अर्जुनवर नवं संकट कोसळणार! ‘ठरलं तर मग’मध्ये शॉकिंग ट्वीस्ट

लक्ष्मीच्या पाऊलांनी

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्यानेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मालिकेने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. या मालिकेने २३व्या आठवड्यात ६.५चा टीआरपी मिळवत दुसरे स्थान कायम ठेवले आहेत. या मालिकेत आता कला आणि अद्वैत यांच्यातील जवळीक आता थोडीथोडी वाढताना दिसत आहे. मात्र, या दरम्यान त्याच्या नात्यात अनेक अडचणी देखील येणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

प्रेमाची गोष्ट

अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेने २३व्या आठवड्यात ६.४ टीआरपी मिळवत तिसरं स्थान पटकावलं आहे. या मालिकेत आता मुक्ता आणि सागर मिळून सावनीसमोर हर्षवर्धनचा खरा चेहरा आणणार आहेत. तर, यामुळे सावनीच्या मनातील मुक्ताबद्दलची इर्षा नाहीशी होणार आहे. आता मुक्ता सावनीला हर्षवर्धनच्या तावडीतून सोडवणार आहे.

आराम आणि रिलॅक्स असं काही नसतं! आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर, शाहरुख खानचा हा ‘मंत्र’ ऐकाच!

तुझेच मी गीत गात आहे

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम राखून ठेवली आहे. या मालिकेने गेली काही वर्ष प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, आता ही मालिका कथानकाच्या शेवटच्या दिशेने प्रवास करत आहे. या मालिकेत आता मल्हारसमोर मोनिकाचा खरा चेहरा समोर आला आहे. तर, वैदही आता मल्हारला स्वरा त्याची मुलगी असल्याचं सत्य सांगणार आहे.

घरोघरी मातीच्या चुली

‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने काहीच दिवसांत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेला २३व्या आठवड्यात ५.९चा टीआरपी मिळाला आहे. या मालिकेत आता जानकी ऐश्वर्याला रणदिवे घराण्याचे नियम शिकवताना दिसणार आहे. ऐश्वर्याचे सगळे कपटी डाव उधळून लावून जानकी आता तिला चांगलाच धडा शिकवणार आहे.

WhatsApp channel
विभाग