Marathi Serial TRP: 'ठरलं तर मग' पुन्हा ठरली अव्वल! पाहा आठवड्याच्या 'टॉप ५' मालिका
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Marathi Serial TRP: 'ठरलं तर मग' पुन्हा ठरली अव्वल! पाहा आठवड्याच्या 'टॉप ५' मालिका

Marathi Serial TRP: 'ठरलं तर मग' पुन्हा ठरली अव्वल! पाहा आठवड्याच्या 'टॉप ५' मालिका

Published Dec 30, 2023 04:23 PM IST

Marathi Serial TRP List Week 51: मालिकांमध्ये आलेल्या काही ट्विस्टमुळे कथानक रंजक झालं आणि प्रेक्षकांना देखील मालिकांमध्ये रस आला. चला तर, बघूया या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्या 'टॉप ५'....

Marathi Serial TRP List Week 51
Marathi Serial TRP List Week 51

Marathi Serial TRP List Week 51: सरत्या वर्षात अनेक मराठी मालिकांनी छोट्या पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घातला. या वर्षाच्या ५१व्या आठवड्यात देखील काही मालिकांनी 'टॉप ५'मध्ये आपली जागा टिकवून ठेवली आहे. या आठवड्यात मालिकांच्या कथानकांमध्ये अनेक वळणं पाहायला मिळाली. मालिकांमध्ये आलेल्या काही ट्विस्टमुळे कथानक रंजक झालं आणि प्रेक्षकांना देखील मालिकांमध्ये रस आला. चला तर, बघूया या आठवड्यात कोणत्या मालिका ठरल्या 'टॉप ५'....

ठरलं तर मग

सायली आणि अर्जुनाच्या या कथेत आता अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आले आहेत. मालिकेची कथा देखील आता अतिशय रंजक वळणारवर आली. एकीकडे मधुभाऊंच्या केसचे पुरावे शोधले जात आहे. तर, दुसरीकडे सायलीला तिचा भूतकाळ देखील आठवू लागल्याने तिच्या आई वडिलांची माहिती देखील शोधली जात आहे. या मालिकेत आता एकाच वेळी अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहेत. 'ठरलं तर मग' मालिकेने या आठवड्यात देखील पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे.

प्रेमाची गोष्ट

सागर आणि मुक्ताच्या आयुष्यात आता खास वळण आलं आहे. दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले आहेत. या लग्नामुळे आता मुक्ता आणि सागर यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलून गेल्या आहेत. आता सागरच्या छोट्याशा मुलीला आता एक आई मिळणार आहे. या मालिकेने ५१व्या आठवड्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

Ira Khan Wedding: आमिर खानच्या लेकीची लगीन घाई! कुठे आणि कधी होणार आयरा खानचं लग्न?

तुझेच मी गीत गात आहे

स्वराच्या आईच्या मृत्यूचं म्हणजेच वैदेहीच्या मृत्यूचं गूढ आता लवकरच उलगडणार आहे. वैदेहीच्या मृत्यूमागे मोनिकाच्या हात असल्याचे देखील समोर येणार आहे, यामुळे मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

तीन बहिणींची आणि तीन भावांची ही नवीकोरी कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नव्यानेच सुरू झालेली ही मालिका टीआरपी शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सध्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. एकमेकांपासून वेगळे झालेले जयदीप आणि गौरी आता पुनर्जन्म घेऊन पुन्हा एकदा एकमेकांसमोर आले आहेत. मॉर्डन गौरी ते, गावखेड्यातील रांगडा गडी जयदीप प्रेक्षकांना आवडला आहे. ही मालिका या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

Whats_app_banner