मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बाई पण भारी देवा’मुळे मालिकांना बसला फटका! या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट पाहिलात का?

‘बाई पण भारी देवा’मुळे मालिकांना बसला फटका! या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट पाहिलात का?

Jun 03, 2024 11:46 AM IST

या आठवड्याचा म्हणजेच २०२४च्या २१व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा प्रीमियर झाल्याने मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे.

‘बाई पण भारी देवा’मुळे मालिकांना बसला फटका!
‘बाई पण भारी देवा’मुळे मालिकांना बसला फटका!

या आठवड्याचा म्हणजेच २०२४च्या २१व्या आठवड्याचा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट नुकताच समोर आला आहे. या आठवड्यात ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा प्रीमियर झाल्याने मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. टीआरपीच्या शर्यतीत या चित्रपटाच्या प्रीमियरने देखील जागा पटकावल्यामुळे एक मालिका टॉप ५ यादीतून बाहेर झाली आहे. चला तर, एक नजर टाकूया टीआरपी शर्यतीतील ‘या’ आठवड्याच्या टॉप ५ मालिकांबद्दल...

ट्रेंडिंग न्यूज

ठरलं तर मग

नेहमीप्रमाणे ‘ठरलं तर मग’ या मालिकेने टीआरपी शर्यतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. या मालिकेला ६.८चे टीआरपी रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत सध्या रंजक वळण पाहायला मिळत आहे. मधुभाऊंच्या केसवर आता लवकरच कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे. सायली, अर्जुन आणि चैतन्य यांनी मिळून साक्षी-महिपत यांच्या विरोधातील सगळे पुरावे गोळा केले आहेत. आता हेच पुरावे सिद्ध करून ते मधुभाऊंना सुखरूप सोडवणार आहेत.

लक्ष्मीच्या पाऊलांनी

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेत सध्या थोडे वेगळे वळण आलेले पाहायला मिळत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने २१व्या आठवड्यात ६.५चे टीआरपी रेटिंग मिळवले आहे. या मालिकेने दुसरे स्थान पटकावले आहे. सध्या या मालिकेत कला आणि अद्वैतच्या भांडणाव्यतिरिक्त मालिकेत रंजक कथानक पाहायला मिळत आहे. कलाच्या अंगावर काम पडावे म्हणून नैनाने सगळ्यांना सुट्टी दिली आहे. मात्र, तिचा हा प्लॅन तिच्यावरच उलटणार आहे.

अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात रणबीर-आलियाच्या लेकीचा थाट! राहाच्या क्युटनेसने जिंकलं साऱ्यांचं मन

बाईपण भारी देवा (वर्ल्ड टीव्ही प्रीमियर)

आपापल्या संसाराच्या पिंजऱ्यातून काही क्षण बाहेर निघून, सगळं काही मागे सोडून परदेशी फिरण्यासाठी निघालेल्या एका महिला गटाची ही कथा ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. नुकताच या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झाला. याला टीव्हीवर देखील चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला टीव्हीवर ६.४चं टीआरपी रेटिंग आणि तिसरं स्थान मिळालं.

अवघ्या १० मिनिटांच्या ऑडिशनने बदलले होते रिंकू राजगुरू हिचे नशीब! शाळेतही घेऊन जायची बॉडीगार्ड्स

प्रेमाची गोष्ट

‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने या आठवड्यात ६.२चा टीआरपी रेट मिळवत चौथे स्थान पटकावले आहे. या मालिकेचे स्थान दिवसेंदिवस घसरताना दिसत आहे. दोनवरून तीनवर आणि तीनवरून आता थेट चौथ्या स्थानावर गेलेली ही मालिका सध्या एका रंजकरणावर पोहोचली आहे. या मालिकेमध्ये सावनी सागरला फसवण्यासाठी एक प्लॅन बनवताना दिसली होती. तर, तिचा हा प्लॅन पूर्ण होण्याआधीच मुक्ता तिला रंगेहाथ पकडताना दिसणार आहे. तर, दुसरीकडे आता सागर आणि मुक्ता यांच्यातील जवळीक वाढताना दिसणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे

‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत आता रंजक वळण पाहायला मिळत आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत पाचवं स्थान पटकावलं आहे. या मालिकेत सध्या वैदेही आणि मोनिका यांच्यातील वाद टोकाला पोहोचले आहेत. वैदहीला इजा पोहोचवण्याच्या नादात मोनिकाने रचलेल्या कटामुळे मल्हार जखमी झाला आहे. या मालिकेला ६.२चा टीआरपी मिळवला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४