Marathi Serial TRP List Week 10: मराठी मनोरंजन विश्वात आता नव्या आणि जुन्या मालिकांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकही छोट्या पडद्यावरच्या मालिका आवर्जून बघत आहेत. प्रेक्षकांमध्य मालिकांची इतकी क्रेझ आहे की, पुन्हा काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसणार आहे. मात्र, या दरम्यान जुन्या मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान टिकवून राहिल्या आहे. परंतु, ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता ‘टॉप ५’ यादीतून बाद झाली आहे. अनेक महिने पहिल्या स्थानावर असणारी ही मालिका आता टीआरपी शर्यतीतून बाहेर फेकली गेली आहे. सध्या या मालिकेतील कथानकावर प्रेक्षक देखील संतापलेले पाहायला मिळत आहेत. चला तर बघूया कोणत्या मालिकांनी ‘टॉप ५’मध्ये स्थान पटकावलं आहे.
‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून आपलं पहिल्या क्रमांकाचं स्थान टिकवून राहिली आहे. नवीन वर्षाच्या दहाव्या आठवड्यात देखील ‘ठरलं तर मग’ ने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. ही मालिका या आठवड्यात देखील टॉप ५च्या यादीत हिल्या स्थानावर आहे. सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात सध्या येत असलेले ट्विस्ट आणि टर्न मालिकेची कथा आणखी रंजक बनवत आहेत. मालिकेला या आठवड्यात ६.९चा टीआरपी मिळाला आहे.
तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. हिंदी मालिका ‘ये है मोहब्बते’चं मराठी व्हर्जन असलेली ही मालिका सध्या छोट्या पडद्यावर चांगलीच पसंत केली जात आहे. या मालिकेतील मुक्ता आणि सागर यांची लव्ह स्टोरी आता एक पाऊल पुढे सरकताना दिसत आहे. या मालिकेला १०व्या आठवड्यात ६.८ इतकं टीआरपी रेटिंग मिळालं आहे.
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत कला आणि अद्वैत यांचं लग्न झालं असून, आता कलाने अद्वैतच्या घरात प्रवेश केला आहे. कलाच्या येण्याने अद्वैतच्या आयुष्यात अनेक बदल होणार आहेत. या मालिकेने १०व्या आठवड्यात तिसरे स्थान पटकावले असून, ६.७ इतके टीआरपी रेटिंग मिळवले आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेने देखील प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. लवकरच मंजुळाचं सत्य सर्वांसमोर येणार आहे. आता हे सत्य नेमकं काय असणार आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. मालिकेने या आठवड्यात टीआरपी शर्यतीत चौथे स्थान पटकावले असून, ६.५ इतका टीआरपी मिळवला आहे.
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत आता नित्या आणि अधिराज यांना आपल्या पुनर्जन्माची आठवण होणार आहे. अधिराजच्या आईला त्याच्या आयुष्यात नित्याचा येणं पटलेलं नाही. मात्र, ही देवीचीच कृपा असल्याचे सगळ्यांचे मत आहे. आता एका उत्सवदरम्यान नित्या म्हणजेच गौरीला तिच्या पुनर्जन्माची आठवण होणार असून, ती अधिराजला जयदीप या नावाने आवाज देणार आहे. या मालिकेने टीआरपीच्या शर्यती पाचवं स्थान पटकावलं असून, ५.८ रेटिंग मिळवले आहे.