OTT Releases: मराठी ओटीटीवर ‘झकास फ्रायडे'; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या..
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Releases: मराठी ओटीटीवर ‘झकास फ्रायडे'; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या..

OTT Releases: मराठी ओटीटीवर ‘झकास फ्रायडे'; प्रेक्षकांना पाहायला मिळणार देशी-विदेशी चित्रपट! कधी आणि कुठे? जाणून घ्या..

Jul 01, 2024 05:15 PM IST

Marathi OTT Releases: 'अल्ट्रा झकास’वर आता 'अल्ट्रा झकास फ्रायडेस'मध्ये दर शुक्रवारी गाजलेले विविध भाषिक चित्रपट मराठीतून पाहण्याची संधी मिळणार आहे.

Marathi OTT Releases Ultra Jhakaas Marathi
Marathi OTT Releases Ultra Jhakaas Marathi

Marathi OTT Releases: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज वेगवेगळा कंटेंट पाहायला मिळत आहे. हिंदीसह हॉलिवूड आणि इतर भाषिक चित्रपटही ओटीटीवर पाहायला मिळतात. आता मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म 'अल्ट्रा झकास’ने देखील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी आणली आहे. 'अल्ट्रा झकास’वर आता 'अल्ट्रा झकास फ्रायडेस'मध्ये दर शुक्रवारी गाजलेले विविध भाषिक चित्रपट मराठीतून पाहण्याची संधी मिळणार आहे. या खास मोहिमेमध्ये प्रेक्षकांना मराठीत डब केलेल्या हॉलिवूडच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह अनेक भाषांमधील सुपरहिट चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

या उपक्रमाचा उद्देश मराठी भाषिक प्रेक्षकांपर्यंत उच्च श्रेणीतील प्रादेशिक भाषा, आशियाई आणि हॉलिवूड चित्रपट पोहोचवणे हा आहे. दर शुक्रवारी, अल्ट्रा झकास फ्रायडेसमध्ये जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या सुपरहिट चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. यात ॲक्शन-पॅक थ्रिलर्स आणि रोमँटिक ड्रामापासून ते ॲनिमेटेड फीचर्स आणि हॉरर फ्लिक्सपर्यंत विविध जॉनरचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून दर शुक्रवारी हे चित्रपट प्रसारित होणार आहेत. यात कोणकोणते चित्रपट पाहायला मिळणार? पाहा यादी...

घिल्ली (धडाकेबाज घिल्ली)

साऊथचा मेगास्टार विजय थलापती आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांचा तमिळ चित्रपट ‘घिल्ली’ने बॉक्स ऑफिसवर त्याच्या ॲक्शन, रोमान्स आणि गाण्यांसह प्रचंड यश मिळवले होते. आता प्रेक्षकांना हा चित्रपट मराठीमध्ये पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धरणी यांनी केले असून, ही कथा वेलू या महत्त्वाकांक्षी कबड्डीपटूची आहे. हा खेळाडू प्रादेशिक कबड्डी खेळात भाग घेण्यासाठी मदुराईला आला होता, जिथे तो धनलक्ष्मीला तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या माणसापासून वाचवतो.

Bigg Boss OTT 3: पायल घराबाहेर पडताच कृतिकाचं सवतीबद्दल मोठं वक्तव्य! म्हणाली ‘जोपर्यंत ती इथे होती…’

बावरे प्रेम हे

‘बावरे प्रेम हे’ या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, उर्मिला कोठारे आणि विद्याधर जोशी यांची अप्रतिम स्टारकास्ट असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय नाईक यांनी केले आहे. यात नील त्याच्या मित्रासोबत गोवा ट्रीपला जातो, जिथे त्याचा अनन्या नावाच्या मुलीशी वाद होतो. पुन्हा जेव्हा त्याची भेट अनन्याशी होते, तेव्हा तो माफी मागतो. पण त्या बदल्यात ती नीलकडे तिचं हरवलेल पुस्तक शोधून देण्यात मदत मागते. मदत केल्यानंतर रोज भेटून ऐकत्र फिरत असताना नीलच्या मनात अनन्याबद्दल भावना निर्माण होतात. नीलच्या मनात प्रेमाची भावना आहे हे कळल्यावर अनन्या त्याचा प्रेमाला स्वीकारेल का?

ए.एम.आय (नवयुग)

जेव्हा तंत्रज्ञान मानवी मनावर ताबा मिळवतो आणि तुम्हाला काही भयानक गोष्टी करायला भाग पाडतो, ज्यामुळे तुमच्या जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. हॉलिवुडचा ‘ए.एम.आय’ म्हणजेच मराठीत ‘नवयुग’ या चित्रपटाचे दिग्दर्शक रस्टी निक्सन आहेत. ही कथा एक सतरा वर्षांची मुलगी कॅसी बद्दल आहे, जिने आपली आई गमावली आहे आणि ती तिच्या फोनवर कृत्रिम तंत्रज्ञानाशी एक खास नाते निर्माण करते, जे तिच्या मनाशी खेळते आणि तिला भयानक गोष्टी करायला लावते. कॅसी या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अंत करू शकेल का? किंवा या प्रक्रियेत ती स्वतःला इजा करेल का?

Gharoghari Matichya Chuli: सौमित्र-अवंतिकाच्या लग्नात राडाच झाला! जानकीने पुन्हा ऐश्वर्याला इंगा दाखवला

गन्स ट्रान्स ॲक्शन

तेलुगू चित्रपट ‘गन्स ट्रान्स ॲक्शन’ या चित्रपटामध्ये चैतन्य पासुपुलेती, हीना राय आणि सुदर्शन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक सिद्धांत यांनी केले असून, तुम्हाला हा चित्रपट मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील पात्रांची रचना GTA या अतिशय प्रसिद्ध गेमच्या आधारे करण्यात आली आहे.

क्लिअरिंग (बापमाणूस)

डेव्हिड मॅटालॉन यांचा हॉलिवूड चित्रपट ‘द क्लिअरिंग’ म्हणजेच ‘बापमाणूस’ आता तुम्ही मराठीमध्ये पाहू शकता. या चित्रपटाची कथा वडील आणि त्यांच्या मुलीभोवती फिरते. हे दोघे एका कॅम्पिंग ट्रिपला गेले असतात आणि तिथे त्यांची मुलगी हरवते. आता या वडिलांना झोम्बींसोबत सामना करून आपल्या बेपत्ता झालेल्या मुलीला शोधायचं आहे. आता तो त्याच्या मुलीला वाचवण्यात यशस्वी होईल का?, हे जाणून घेण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.

Whats_app_banner