एप्रिल महिन्यात सर्व शाळा, कॉलेजांना सुट्टी लागते. त्यामुळे या सुट्टीच्या दिवसात नेकमं काय करावा असा प्रश्न पालकांना देखील सतावत असतो. काही पालक मुलांना घेऊन चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतात, काही पालक मुलांना एकदिवशीय सहल म्हणून कुठे तरी फिरवून आणतात. आता या महिन्यात कोणते नवे मराठी चित्रपट तुमच्या भेटीला येणार चला जाणून घेऊया.
महेश मांजरेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत असणारा 'जुनं फर्निचर' हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जात आहे.
वाचा: मयूरी देशमुखचा 'लग्नकल्लोळ' पाहिलात का? नाही ना मग घर बसल्या ओटीटीवर पाहा
'माहेरची साडी' या चित्रपटाच्या यशानंतर विजय कोंडके यांचा 'लेक असावी तर अशी' हा चित्रपट येणार आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा कौटुंबिक सिनेमा थिएटरमध्ये पाहणे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर विजय कोंडके एका रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
वाचा: रेखा अन् जया सोडून महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात होते अमिताभ बच्चन, मित्राने केली पोलखोल
आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा 'मायलेक' हा चित्रपट वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री सोनाली खरेची मुलगी पदार्पण करत आहे. हा चित्रपट १९ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, संजय मोने हे कलाकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित "संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. आता हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.