भारतातील महाराष्ट्र या राज्यात १ मे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तसेच हा दिवस मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. कारण हा दिवस महाराष्ट्र दिवस, कामागार दिवस आणि मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही ठिकाणी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगणारी भक्तीपर गीते वाजवली जातात. महाराष्ट्रात साजल्या केल्या जाणाऱ्या या दिवशी अनेकांना सुट्टी देखील असते. या सुट्टीच्या दिवशी नेमकं काय करायचं असा प्रश्न सर्वांना पडतो. काही जाण चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. तर काही जण घरातच वेळ घालवतात. पण जर तुम्ही एखादा चित्रपट पाहण्यासाठी बाहेर जाणार असाल तर दोन मराठी सिनेमे चांगला पर्याय ठरु शकतो.
गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका अभिनेते सुनील बर्वे साकारत आहे तर त्याच्या पत्नीची भूमिका म्हणजेच ललिताबाईंची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडे साकारत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन हे योगेश देशपांडे यांनी केले आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक संगीताची मजेवानी आहे. त्यामुळे आज हा चित्रपट पाहाणे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो.
वाचा: “गर्जा महाराष्ट्र माझा!”, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऐका ‘ही’ अभिमान गीते
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये परेश मोकाशी हे नाव खूप मोठे आहे. त्यांचा दिग्दर्शनातला 'नाच गं घुमा' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचे कलाकार हे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. आज १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, सारंग साठ्ये आणि बालकलाकार मायरा वायकुळ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा चित्रपट पाहणे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो.
वाचा: घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा
१ मे रोजी प्रदर्शित होणारे दोन मराठी चित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ आणि 'नाच गं घुमा' सर्वांचे लक्ष वेधत आहेत. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता कोणता चित्रपट वरचढ ठरणार हे येत्या काळात कळणार आहे.
वाचा: 'लोकांना लाज का वाटत नाही', इंटीमेट सीनवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीने सुनावले