‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून विकेण्डला अनेक ठिकाणी ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकला आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी चित्रपटाची टीम चित्रपटगृहांना सध्या भेटही देत आहे. नुकताच अभिनेत्री अंकिता लांडे पाटील हिने चित्रपटगृहाला भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी ही कथा भावली असल्याचे सांगितले. काही महिला चित्रपट पाहून अतिशय भावुक झाल्या तर काही महिलांनी यावेळी आपले अनुभव शेअर केले. हे अनुभव शेअर करताना काहींना अश्रुही अनावर झाले.