Filmy Nostalgia: एका गंभीर अपघातामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अभिनेत्री रंजना यांची कहाणी ऐकलीत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Filmy Nostalgia: एका गंभीर अपघातामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अभिनेत्री रंजना यांची कहाणी ऐकलीत का?

Filmy Nostalgia: एका गंभीर अपघातामुळे क्षणात होत्याचं नव्हतं झालं! अभिनेत्री रंजना यांची कहाणी ऐकलीत का?

Sep 15, 2023 02:56 PM IST

Marathi Filmy Nostalgia: अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांना मागे टाकले होते. मात्र, एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले.

actress Ranjana Deshmukh
actress Ranjana Deshmukh

Marathi Filmy Nostalgia: मराठी मनोरंजन विश्वाने या चित्रपट जगातला अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. या कलाकारांनी केवळ मनोरंजन विश्वचं गाजवले नाही तर, प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा देखील निर्माण केली होती. आज जरी हे कलाकार या जगात नसले, तरी अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री रंजना देशमुख. रंजना यांनी मनोरंजन विश्वात आपली हक्काची जागा निर्माण केली होती. त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र, त्यांचे वैयक्तिक आयुष्य खूपच दुःखद होते. एका अपघाताने त्यांचे संपूर्ण आयुष्यचं बदलून गेलं.

अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांना मागे टाकले होते. त्यांनी अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर दिली होती. रंजना यांनी कमी वयातच मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. व्ही. शांताराम यांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या १९६५मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासू वरचढ जावई’, ‘सुशीला’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘असला नवरा नको ग बाई’,’गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा एकापेक्षा एक चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.

Sara Kahi Tichyasathi: रंगवलेले केस अन् शॉर्ट पँट; खोतांच्या घरी आलेल्या पाहुणीवरुन गावात रंगलीय चर्चा!

रंजना यांनी आपल्या दमदार अभिनयाने मनोरंजन विश्व असे गाजवले की, त्याकाळात त्यांना टक्कर देणारी एकही अभिनेत्री नव्हती. तर, रंजना आपल्या चित्रपटात असाव्या म्हणून अनेक निर्माते ताटकळत असायचे. मात्र, कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या आयुष्यात अशी घटना घडली की, त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. त्यावेळी रंजना या ‘झुंजार’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बंगळूरूला निघाल्या होत्या. मात्र, त्या बंगळुरुला जात असताना त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात रंजना यांचे दोन्ही पाय निकामी झाले. केवळ पायच नाही तर, त्यांचा डावा हात देखील काम करेनासा झाला. या अपघातावेळी रंजना अवघ्या ३२ वर्षांच्या होत्या. या अपघातानंतर त्या व्हीलचेअरवर खिळल्या. त्यांनी आयुष्याची पुढची १३ वर्ष अशीच व्हीलचेअरवर बसून काढली होती.

या अपघातानंतर त्यांचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त झाले. इतकेच नाही तर, त्यांच्या आयुष्यातील प्रेम देखील त्यांच्यापासून दुरावले. यानंतर ते एकाकी आयुष्य जागल्या आणि राहत्या घरी वयाच्या ४५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Whats_app_banner