आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप

आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या; पुण्यातील कार अपघातावर मराठी दिग्दर्शकाचा संताप

Aarti Vilas Borade HT Marathi
May 22, 2024 02:22 PM IST

पुण्यातील कार अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली. या घटनेवर आता मराठमोळ्या दिग्दर्शकाने संताप व्यक्त करत पोस्ट लिहिली आहे.

Kshitij Patwardhan: मराठमोळ्या दिग्दर्शकाने पुणे कार अपघातावर संताप व्यक्त केला
Kshitij Patwardhan: मराठमोळ्या दिग्दर्शकाने पुणे कार अपघातावर संताप व्यक्त केला

पुण्यात रविवारी रात्री अडीच वाजता झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कल्याणीनगर परिसरात एक अल्पवयीन मुलगा दारु पिऊन गाडी चालवत होता. त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवर असलेल्या जोडप्याचा जागीच मृत्यू झाला. तरीही याप्रकरणी मुलाला जामीन मिळाला. आरोपीला कोर्टात दाखल केल्यानंतर कोर्टाने अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांत निंबध लिहायला सांगितला तसेच पोलिसांसोबत वाहतूक नियमन करण्याची शिक्षा सुनावली. या घटनेवर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता मराठमोळ्या दिग्दर्शकाने देखील पोस्ट शेअर केली आहे.

काय आहे दिग्दर्शकाची पोस्ट?

मराठी दिग्दर्शक क्षितिज पटवर्धनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्याने 'मुंबईत होर्डींग असो किंवा पुण्यात गाडी, या देशात गुन्हा दडवायला जेवढ्या तत्परतेने सिस्टीम एकत्र येते, तेवढी सोडवायला येत नाही हे खरं दुर्दैव आहे. आपण नाव, जागा बदलत श्रद्धांजलीच्या पोस्ट लिहायच्या फक्त!' असे म्हणत संताप व्यक्त केला आहे. क्षितीजची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
वाचा: 'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

नेटकऱ्यांनी केल्या पोस्टवर कमेंट

क्षितिजच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'सिस्टिम गोरगरिबांसाठी बनवलीच नाही. ती फक्त पैसेवाल्यांसाठी बनवली आहे. गरीब रोज फालतूचे मरण मरतोय' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'तू म्हणालास अगदी बरोबर आहे मित्रा' असे म्हणत क्षितिजला पाठिंबा दिला आहे. तिसऱ्या एका यूजरने 'भारतीय न्याय व्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली' असे म्हणत राग व्यक्त केला आहे.
वाचा: नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

क्षितिज पटवर्धनच्या कामाविषयी

क्षितिज पटवर्धन हा मराठी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे 'आज्जीबाई जोरात' हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकात AIचा वापर करण्यात आला आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच या नाटकामध्ये निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, पुष्कर श्रोत्री हे कलाकार महत्त्वाची भूमिका साकरताना दिसत आहेत.
Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

Whats_app_banner