Ankit Mohan Injured: 'बाबू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अंकित मोहनला गंभीर दुखापत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ankit Mohan Injured: 'बाबू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अंकित मोहनला गंभीर दुखापत

Ankit Mohan Injured: 'बाबू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अंकित मोहनला गंभीर दुखापत

Aarti Vilas Borade HT Marathi
Jul 14, 2024 03:05 PM IST

Ankit Mohan Injured: 'बाबू' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता अंकित मोहनला झाली गंभीर दुखापत. तातडीने रुग्णालयात दाखल.

Ankit Mohan Injured
Ankit Mohan Injured

मराठी चित्रपटसृष्टीमधील सध्या अनेक वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. लवकरच 'बाबू' हा एका वेगळ्या विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अंकित मोहन आणि रुचिरा जाधव महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. या प्रमोशन दरम्यान अभिनेता अंकित मोहनला दुखापत झाली आहे.

काय झालं नेमकं?

'बाबू'ची भूमिका साकारणारा अंकित मोहन, रुचिरा जाधव यांनी पारंपरिक पेहरावात नुकतेच आपल्या कोळी बांधवाना, भगिनींना भेटायला नवी मुंबईतील दिवाळे गावातील मासे मार्केटमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत निर्माते बाबू कृष्णा भोईरही होते. यावेळी चित्रपटातील टायटल साँगवर नृत्य करताना धारदार कोयता लागून अंकितच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अशातही तो नाचत होता, परंतु हातातून रक्त वाहू लागल्याने सगळे कोळी बांधव लगेच त्याच्या मदतीला धावून आले. गंभीर दुखापत असल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. अंकितच्या हाताला नऊ टाके पडले आहेत.

तातडीने अंकितला पोहोचवले रुग्णालयात

'बाबू' चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दुखापत झाल्यानंतर अंकितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर अंकित आपल्या कोळी बांधवाना भेटण्यास आणि त्यांचे आभार मानण्यास पुन्हा त्या मार्केटमध्ये गेला. या सगळ्यांचे प्रेम बघून अंकित भारावून गेला.

बाबू चित्रपटाविषयी

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत 'बाबू' या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे , संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
वाचा: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील हा कलाकार पुन्हा दिसणार मालिकेत? नाव ऐकून चाहते झाले आनंदी

घटनेबद्दल अंकित म्हणतो, "कोळी बांधवांबद्दल मला आदर आहेच, परंतु आज त्यांच्यातील माणुसकी, आत्मीयता पाहून हा आदर अधिकच वाढला आहे. मला दुखापत झाल्यानंतर हे सगळे ज्या पद्धतीने माझ्या मदतीला आले, हे पाहून मी खूपच भारावलो. या सगळ्या गोंधळात आमची चर्चा अर्धीच राहिली आणि यांच्याकडून जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणूनच उपचारानंतर मी या माझ्या बांधवाना भेटायला परत आलो. या निमित्ताने यांच्याप्रती असलेली कृतज्ञता मला व्यक्त करता आली. जशी आपुलकी त्यांनी या क्षणी माझ्याबद्दल दाखवली तसेच प्रेम 'बाबू'वरही करा.''

Whats_app_banner