Pushkar Jog: पुष्कर जोगच्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pushkar Jog: पुष्कर जोगच्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर, काय आहे कारण?

Pushkar Jog: पुष्कर जोगच्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर, काय आहे कारण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 12, 2024 06:41 PM IST

Pushkar Jog Upcoming movie: मराठी चित्रपटसृष्टीमधील एआयवर आधारित पहिला सिनेमा कधी भेटीला येणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

Pushkar Jog
Pushkar Jog

आजकाल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. आता मराठीमध्ये पहिल्यांदाच AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंटवर आधारित हा चित्रपट आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. त्यानंतर चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामागे नेमकं काय आहे कारण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

कधी होणार चित्रपट प्रदर्शित

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

कोणते कलाकार दिसणार?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवीन अनुभवायला मिळणार असल्यामुळे सर्वजण प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. आता चित्रपट सप्टेंबर ऐवजी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
वाचा : रणवीर सिंगनंतर अभिनेत्रीने केले अर्धनग्न अवस्थेत फोटोशूट, नेटकऱ्यांनी केली जोरदार टीका

काय आहे चित्रपटाची कथा?

'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाचा दिग्दर्शक पुष्कर जोगने कथा सांगितली आहे. "'धर्मा- दि एआय स्टोरी' प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. हा एक वेगळा विषय असून एका वडिलांची आणि मुलीची ही गोष्ट आहे. एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका निष्ठावंत बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. आपल्या मुलीला पुन्हा जिवंत पाहाण्यासाठी धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या वडिलांची ही गोष्ट आहे. हॅालिवूडमध्ये ज्याप्रमाणे ॲक्शन सिक्वेन्स असतात, तसे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. एक नवा प्रयत्न यातून करण्यात येत आहे" असे पुष्कर जोगने म्हटले आहे.

Whats_app_banner