Actress Urmila Nimbalkar: नुकताच केंद्र सरकारच्या वतीने ‘नॅशनल क्रिएटर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आले. अनेक प्रसिद्ध युट्युबर्सचा सन्मान यावेळी करण्यात आला. मात्र, सर्वाधिक मत मिळून देखील अभिनेत्री उर्मिला निंबाळकर हिला पुरस्कार न मिळाल्याने चाहते नाराज झाले होते. सर्वाधिक मत मिळून देखील ‘हेरीटेज फॅशन आयकॉन’ पुरस्कार उर्मिला निंबाळकर हिला का मिळाला नाही, याचं कारण आता स्वतः उर्मिलानेच सगळ्यांना सांगितलं आहे.