मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Actress Tejashree Engagement : अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो

Actress Tejashree Engagement : अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2024 01:47 PM IST

Marathi Actress Tejashree Engagement : मराठमोळी अभिनेत्री तेजश्रीने नुकताच बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. तिच्या साखरपुड्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो
अभिनेत्री तेजश्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, शेअर केले फोटो

Actress Tejashree Engagement Photos: गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहे. मग ते बॉलिवूड कलाकार असू देत वा मराठी कलाकार एका पाठोपाठ एक असे लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आहे. तिने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थिती गुपचूप साखरपुडा केला आहे. ही अभिनेत्री तेजश्री जाधव आहे. तिने बॉयफ्रेंड रोहन सिंहशी साखरपुडा केला आहे.

काही दिवसांपूर्वीच तेजश्रीने प्रेमाची कबुली दिली होती. प्रियकर रोहन सिंहने तेजश्रीला समुद्र किनाऱ्यावर रोमँटिक अंदाजात प्रपोज करत लग्नाची मागणी घातल्याचे फोटो तेजश्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करताना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता तेजश्रीचा साखरपुडा झाल्याचे समोर आले आहे.
वाचा: ‘लापता लेडीज’ सिनेमा कसा आहे? सलमान खानने दिला रिव्ह्यू

तेजश्रीने साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने हिरव्या रंगाची पारंपरिक साडी नेसली आहे. नकात नथ, कपाळी चंद्रकोर आणि केसात गजरा अशा या लूकमध्ये तेजश्री अतिशय सुंदर दिसत आहे. तर रोहनने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. दोघे ही अतिशय आनंदी दिसत आहे. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
वाचा: ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार तब्बल ८ सिनेमे अन् वेब सीरिज, तारीख नोट करा!

तेजश्रीच्या कामाविषयी

तेजश्री जाधवने सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेल्या 'अकिरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. त्याशिवाय तिने प्रविण तरडे यांच्या 'बलोच' या चित्रपटात काम केले. २०१६ मध्येच तिने अट्टी या दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'माधुरी टॉकीज' वेब सीरिजमध्येही तिने काम केले होते.

IPL_Entry_Point