मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत

ती परत येतेय... ; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत

Aarti Vilas Borade HT Marathi
May 09, 2024 12:01 PM IST

अभिनेत्री शिवानी सुर्वे तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याचे ऐकून चाहते आनंदी झाले आहेत. आता तिच्या या नव्या मालिकेविषयी जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक आहेत.

ती परत येतेय...; तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे दिसणार 'या' मालिकेत

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी सुर्वे ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवयानी मालिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास ९ वर्षांनंतर शिवानी सुर्वे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. आता प्रेक्षकांमध्ये तिच्या या मालिकेविषयी उत्सुकता वाढली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे मालिकेची कथा?

स्टार प्रवाह वाहिनीची नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’मधून शिवानी तब्बल ९ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती मानसी सणस ही भूमिका साकारणार आहे. अतिशय हुशार, स्वाभिमानी, प्रामाणिक असलेली मानसी आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जराही नाही. वडिलांनी खूप कष्ट करून त्यांचे साम्राज्य उभे केले आहे. आपल्या मुलीनेही खूप शिकून नाव कमवावे असे त्यांचे स्वप्न आहे. वडिलांचे स्वप्न मानसीला काही करुन पूर्ण करायचे आहे.
वाचा: गौतमी पाटीलचं नशीब चमकलं! ‘द महाराष्ट्र फाइल्स’ सिनेमातील हिंदी गाण्यावर थिरकरणार

कॉलेजची टॉपर असणारी मानसी

दुसरीकडे कॉलेजची टॉपर गायत्री मॅडमच्या हुशारीवर मानसी खूप प्रभावित आहे. पण आपल्या समोर कुणालाही जिंकू न देणाऱ्या गायत्रीच्या स्वार्थी स्वभावाची तिला जराही कल्पना नाही. खरी ठिणगी तेव्हा पडते जेव्हा मानसी पदवी परिक्षेत टॉप करुन गायत्रीचा रेकॉर्ड ब्रेक करते. मानसीला नाती जोडून ठेवायला खूप आवडतात. कुठलेही नाते असो टिकवायचे असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालणार नाही. नाते परिपूर्ण होण्यासाठी थोडे तुझे आणि थोडे माझे असावे लागते असे मानसी म्हणते.
वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार

वाचा: बिग बॉस फेम वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागम, 'या' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार|#+|

तब्बल ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करण्यासाठी अभिनेत्री शिवानी सुर्वे प्रचंड उत्सुक आहे.  या विषयी बोलताना तिने मनातल्या ङ‘स्टार प्रवाह कुटुंबासोबत पुन्हा एकदा जोडली जातेय याचा आनंद आहे. स्टार प्रवाहच्या मालिकांचे विषय, त्याची मांडणी मला खूपच भावते. त्यामुळेच थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेसाठी मी लगेच होकार दिला. मानसी हे पात्र मला अतिशय आवडलं. देवयानी मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. हेच प्रेम आणि यश माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.’ अश्या शब्दात शिवानीने आपली भावना व्यक्त केली. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं १७ जूनपासून रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
वाचा: गौरव मोरेने सोडला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम, काय आहे कारण? जाणून घ्या

IPL_Entry_Point

विभाग