Sanika Bhoite: ‘आईचं स्वप्न पूर्ण केलं’; अवघ्या २२व्या वर्षी मराठी अभिनेत्रीनं खरेदी केली आलिशान कार!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanika Bhoite: ‘आईचं स्वप्न पूर्ण केलं’; अवघ्या २२व्या वर्षी मराठी अभिनेत्रीनं खरेदी केली आलिशान कार!

Sanika Bhoite: ‘आईचं स्वप्न पूर्ण केलं’; अवघ्या २२व्या वर्षी मराठी अभिनेत्रीनं खरेदी केली आलिशान कार!

Published Jan 09, 2024 05:03 PM IST

Sanika Bhoite Luxury Car: मराठी अभिनेत्री सानिका भोईटे हिने तिच्या मेहनतीच्या बळावर अवघ्या २२व्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली आहे.

Marathi Actress Sanika Bhoite
Marathi Actress Sanika Bhoite

Sanika Bhoite Luxury Car: स्वत:ची कार असावी, हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. मात्र, हेच स्वप्न जर करिअरच्या सुरूवातीस साकार होणे, हे फार अवघड आहे. परंतु, मराठी अभिनेत्री सानिका भोईटे हिने तिच्या मेहनतीच्या बळावर अवघ्या २२व्या वर्षी आपल्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली आहे. गेल्यावर्षी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या आईला विचारलं होतं की, आई तुला यावर्षी माझ्याकडून कायं हवं. त्यावेळी आईने तिला सांगितलेले की, तू एक आलिशान कार खरेदी कर. आता सानिकाने तिच्या आईचे स्वप्न वर्षाच्या अखेरीस पूर्ण केलं आहे.

अभिनेत्री सानिका भोईटे हिने आलिशान मर्सिडीज कार खरेदी केली आहे. अभिनेत्री सानिका भोईटे हिने आजवर ‘पोरी तुझे नादान’, ‘भन्नाट पोरगी’, ‘हुरपरी’, ‘रूप साजरं’, ‘तुझी माझी यारी’, ‘साज तुझा’ अशा अनेक मराठी गाण्यांमध्ये तिने अभिनय केला आहे. तिच्या सर्वच गाण्यांचे व्ह्यूज हे मिलीयन पार गेले आहेत. सध्या तिचे इंस्टाग्रामवर १ मिलीयन फॉलोवर्स आहेत. सानिका भोईटे हि एक यशस्वी युट्युबर देखील आहे. तिच्या युट्यूब चॅनेलवर २ लाख सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा फार मोठा चाहतावर्ग आहे.

अभिनेत्री सानिका भोईटे तिच्या करिअरविषयी बोलताना सांगते की, ‘मी साताऱ्यातील फलटण या गावातून पुणे येथे शिक्षणासाठी एकटीच आले. पुण्यात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून २०२२मध्ये बॅचलर इन बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशनचं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं. आणि आता मी पुण्यातचं राहते. माझं शिक्षण सुरू असताना, मला ग्लॅमरस बॉलिवूड जगाची भुरळ पडली. मी वयाच्या १८व्या वर्षापासून इंस्टाग्रामद्वारे तब्बल २२ पेक्षा जास्त मोठ्या ब्युटी ब्रॅंडसोबत कामे केली. शिवाय मी अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले. त्यात सोशल मीडिया हे असं माध्यमं आहे, जिथे आपण आपल्यातील टॅलेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. हा प्रवास सोप्पा नव्हता. परंतु मी कायम प्रामाणिक प्रयत्न करेन. भविष्यात संधी मिळाल्यास मला वेब सीरिजमध्ये काम करायला नक्की आवडेल.’

Whats_app_banner