पावसाळा सुरु झाला की मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळते. मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचते, रेल्वे ट्रॅकवर पाणी भरते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. अशा परिस्थितीत नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागते. अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. पण काही वेळातच सईने तिची ही पोस्ट डिलिट केली आहे.
सई ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने 'आज मुकाट्याने घरी बसा' असे म्हटले होते. तिने मुंबईकरांना घरात बसण्यासाठी आव्हान केले होते. टेक केअर मुंबई अस म्हणत तिने सगळ्यांना काळजी देखील घ्यायला सांगितले होते. सईची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेकांनी यावर कमेंट केल्या होत्या. पण काही वेळातच सईने ही पोस्ट डिलिट केली. आता सईने ही पोस्ट डिलिट का केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा : “रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात", अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट
सईने हंटर, भक्षक या सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ती लवकरच 'मटका किंग' या हिंदी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचे चित्रीकरण सुरु झाले असून नागराज मंजुळे या सीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. तसेच सई 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपट दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दुनियादारी' या चित्रपटाचा सीक्वेल आहे. या चित्रपटात सईसोबत अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी हे कलाकार दिसणार आहेत.
वाचा : श्रेया मोठा गेम झाला यार; ‘पुन्हा दुनियादारी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आज मुंबई, उपनगरे आणि ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी अतिदक्षीचा इशारा म्हणजे रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे व सातारा येथील घाट विभागात देखील अतिवृष्टीचा ईशारा दिला आहे.
वाचा : जुई गडकरी हिला लग्नाच्या पंगतीतून उठवलं होतं; नेमकं काय घडलं होतं? वाचा!