माहिती तंत्रज्ञानाचे जाळे आजच्या युगात एवढे घट्ट विणले गेले आहे की आपण सर्वस्वी त्यात गुरफटून गेलो आहोत. थोडक्यात आज संगणकाचे, फोनचे ज्ञान ज्यांना आहे त्यांना साक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात पत्र लिहिणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हा अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तिने लिहिले पत्र सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाच्या निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे. पूजा स्वतः स्वामीभक्त आहे. त्यामुळे पूजानं अत्यंत तळमळीनं स्वामींना पत्र लिहिलं आहे. त्यात पूजानं स्वतःसाठी काहीही न मागता अतिशय भावनिक मुद्दा मांडला आहे. मुक्या प्राण्यांची मदत करण्याची बुद्धी सर्वांना मिळावी, भूतदयेच्या कामात कधीही कमी पडणार नाही इतकं सक्षम करा, माझा पत्ता जरी सध्या बदललेला असला तरी मन मोकळ करण्याच्या निमित्ताने तुम्हाला पत्र पाठवण्याचा पत्ता मला मिळाला आहे अशी भावना पूजानं पत्रात व्यक्त आहे. त्यामुळे या पत्रातून पूजाचं प्राणीप्रेमही दिसून येत आहे.
प्रिय स्वामी, परवा सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली. देवाकडे सोशल मिडिया नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम नाही. पण स्वत:चा पत्ता आहे. मुक्काम पोस्ट देवाचे घर. खरच किती दिवस झाले ना कोणाला पत्र लिहून. म्हणून आज थेट तुम्हाला पत्र लिहित आहे. आज मी माझ्यासाठी काहीही मागणार नाही. पण तुमच्या दत्त आवतारातील तुमच्या पायाशी जे चौघे उभे आहेत ना मी त्यांच्यासाठी मागणार आहे. स्वामी या जगात कुठलाही मुका प्राणी जेव्हा एका संकटात असेल तेव्हा आपल्यातील कोणी तरी त्यांचा देव बनून त्यांच्या मदतीला जाईल आणि त्या मुक्ता प्राण्यांना मदत करेन ही बुद्धी जगातील सर्वांना द्या.
वाचा: प्राजक्ता माळी प्रकरणावर अभिनेता गश्मिर महाजनीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला 'मला एवढंच माहितीय की...'
पूजा सावंतचा ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ हा नवा सिनेमा येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूजाने हे पत्र लिहिले आहे. या पत्राची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाची निर्मिती मनीष कुमार जायसवाल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संकेत माने यांचे असून संकेत माने, सुमित गिरी यांनी पटकथालेखन, सुमित गिरी यांनी संवादलेखन केले आहे.
संबंधित बातम्या