Nishigandha Wad: मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात दाखल
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nishigandha Wad: मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात दाखल

Nishigandha Wad: मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात दाखल

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 19, 2024 10:40 AM IST

Nishigandha Wad : अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा मालिकेच्या सेटवर अपघात झाला आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Nishigandha Wad
Nishigandha Wad

Nishigandha Wad Accident : आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड. त्यांनी हिंदी, मराठी मालिकाविश्वामध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच निशिगंधा यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता मालिकेच्या सेटवर नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया...

निशिगंधा यांना नेमकं काय झालं?

‘टाइम नाउ’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कलर्स टीव्ही’वरील ‘सुमन इंदोरी’ या हिंदी मालिकेच्या सेटवर अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा अपघात झाला आहे. यामुळे मालिकेतील इतर कलाकारांसह क्रूला धक्का बसला आहे. मालिकेतील एका सीनच्या चित्रीकरणादरम्यान निशिगंधा वाड घसरून पडल्या. त्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. तातडीने निशिगंधा वाड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. निशिगंधा वाड यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांनी त्यांना काही दिवसांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच या घटनेनंतर ‘सुमन इंदोरी’ मालिकेच्या प्रॉडक्शन टीमने सुरक्षेच्या कारणास्तव आणि खबरदारीचा उपाय म्हणून चित्रीकरण तात्पुरतं थांबवलं आहे.

एका व्यक्तीने सांगितली घटना

निशिगंधा यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सेटवरील एक व्यक्ती म्हणाली, 'हा अनपेक्षित अपघात होता. निशिगंधा मॅडम धोक्याबाहेर असल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. त्या एक फायटर आहेत. त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. याशिवाय प्रॉडक्शनकडून चाहत्यांना एक आश्वासन देण्यात आलं आहे. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी सुरक्षा प्रोटोकॉलची अंमलबजावणी केली जाईल.'
वाचा: नागा चैतन्य शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पाहुण्यांना काय भेट दिली पाहा

निशिगंधा यांच्या कामाविषयी

निशिगंधा या ९०च्या दशकापासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी मराठी आणि हिंदी मालिकाविश्वामध्ये काम करण्यासोबतच काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. ‘ससुराल सिमर का’, ‘मेरी गुडिया ‘, ‘कभी कभी इत्तेफाक’, ‘रब से है दुआ’ अशा अनेक लोकप्रिय हिंदी मालिकेत त्या दिसल्या होत्या. आता सध्या त्या ‘सुमन इंदोरी’ या मालिकेत दिसत आहेत. त्यांची या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत आहे. दरम्यान, त्यांच्या अपघताची बातमी ऐकून सर्वांना धक्का बसला आहे.

Whats_app_banner