कलाकारांचे आयुष्य हे कायमच चर्चेत असते. जिवंतपणी कधी त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चा रंगते तर कधी खासगी आयुष्यामुळे. कधी कधी तर कलाकारांच्या मृत्यूनंतरही अनेक गोष्टी समोर येतात आणि त्याची चर्चा रंगते. सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या निधनाची चर्चा रंगली आहे. पण जेव्हा या अभिनेत्रीला निधनाची अफवांची माहिती मिळाली तेव्हा तिने सोशल मीडियावर लगेच पोस्ट शेअर करुन या सर्व अफवांकडे लक्ष देऊ नका असे म्हटले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या निधनाची बातमी सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी नीना यांना श्रद्धांजली वाहिली. या बातम्या पाहून नीना यांनी संताप व्यक्त केला.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या निधनाच्या बातम्या ऐकून नीना यांनी संताप व्यक्त केला आहे. नीना यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, 'सध्या यूट्यूबवर माझ्या निधनाची फेक बातमी व्हायरल होताना दिसत आहे. देवाच्या कृपेने मी जिवंत आहे, सर्व कामे करत आहे आणि कामांमध्ये व्यस्त आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी दीर्घायुषी आहे' असे म्हटले आहे. सध्या सगळीकडे नीना यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू
अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी ‘चौकट राजा’ चित्रपटात झळकलेले अभिनेते दिलीप कुलकर्णी यांच्याशी लग्न केलं.दिलीप कुलकर्णी यांनी ‘सर्वसाक्षी’, ‘विनायक’,’आई’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं. पती दिलीप कुलकर्णी याचं २००२ मध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्या निराधार झाल्या. सध्या नीना या येड लागलं प्रेमाचं मालिकेत दिसत आहेत. तसेच त्यांनी द डिग्नेचर या चित्रपटात काम केले आहे.
संबंधित बातम्या