Marathi Actress Comeback in India: मराठी मालिका विश्वात अनेक कलाकार आले अन् गेले. मात्र, यातील काही कलाकार असे होते, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. मालिका विश्वातून दूर झाल्यानंतर देखील हे कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. अशाच कलाकारांपैकी एक नाव आहे अभिनेत्री मृणाल दुसानीस. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून मृणाल दुसानीस हिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेतून तिला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले होते. या मलिकेनंतरही तिने काही मालिकांमध्ये काम केले. मात्र, त्यानंतर तिने लग्नगाठ बांधून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. आता लग्नाच्या ४ वर्षांनंतर ती भारतात परतली आहे.
लग्नाच्या तब्बल ४ वर्षांनंतर भारतात परतलेली मृणाल दुसानीस आता आपल्या गावी पोहोचली आहे. देवभूमी नाशिकमध्ये पोहोचलेली मृणाल दुसानीस गोदाघाटावर जाऊन पोहोचली आहे. या ठिकाणाहून आपला फोटो शेअर करत तिने एक पोस्ट लिहिली आहे. मृणाल दुसानीस हिला भारतात पाहून चाहते देखील आनंदून गेले आहेत. मृणालला पाहून सगळ्यांनाच आता तिच्या सगळ्या मालिकांची आठवण आली आहे. मालिका विश्वात मृणाल दुसानीस हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तू तिथे मी’, ‘असं सासर सुरेख बाई’, ‘सुखांच्या सरीचे हे मन बावरे’ अशा मालिकांमधून मृणाल दुसानीस हिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.
मालिका विश्व गाजवल्यानंतर २०१६मध्ये मृणाल दुसानीस हिने नीरज मोरे याच्याशी लग्नगाठ बांधली होती. यानंतर तिने पतीसोबत परदेशीच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. नीरज आणि मृणाल या जोडीला एक मुलगी देखील आहे. मृणाल दुसांनीस मनोरंजन विश्वापासून दूर राहून आपल्या पतीसोबत परदेशातच संसार थाटून आनंदाने आपला संसार सांभाळत होती. आता चार वर्षानंतर भारतात परत येऊन तिने आपल्या मूळ गावी भेट दिली आहे. मूळची नाशिकची असणाऱ्या मृणालने भारतात परतल्यावर पहिलं नाशिक गाठलं आहे. नाशिकमध्ये आल्यानंतर गोदाकाठी जाऊन तिने गोदामाईचं दर्शन घेतलं आहे.
या दरम्यान काही फोटो शेअर करून तिने चाहत्यांना याची माहिती दिली आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं की. ‘चार वर्षानंतर मी भारतात परतले. मी माझ्या मूळ गावी आले आहे. माझं नाशिक. गोदाघाट’, असं म्हणत तिने गोदाघाटावरचे स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत.
संबंधित बातम्या